चित्रपटाच्या पोस्टरवर झळकले राज ठाकरे, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापूर्वी प्रदर्शित होणार चित्रपट

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही या चित्रपटाची निर्माती असून या चित्रपटामध्ये राज ठाकरे हे देखील दिसणार आहेत असे सांगण्यात येक आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

एका मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले असून या चित्रपटाच्या पोस्टरवर राज ठाकरे यांची छबी झळकली आहे. चित्रपटातील मुख्य हिरोच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही या चित्रपटाची निर्माती असून या चित्रपटामध्ये राज ठाकरे हे देखील दिसणार आहेत असे सांगण्यात येक आहे.

हे ही वाचा : महिला अत्याचाराच्या घटनांवरून मविआवर सडकून टीका, राज ठाकरे मोदींची भेट घेणार

या चित्रपटाचे शूटींग मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून सुरू करण्यात आले होते. या चित्रपटात गुढी पाडवा मेळावा, राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत घेतलेल्या बैठका यांचेही चित्रकरण करण्यात आले असून राज ठाकरे स्वत: या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय राज ठाकरेंची भूमिका साकारणारा एक अभिनेताही असून तो कोण आहे याचे अद्याप गूढ उकललेले नाही.

10 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवाजी पार्कात दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. दसरा मेळाव्याच्या दोन दिवस आधी राज ठाकरे ज्या चित्रपटात झळकणार आहेत त्या चित्रपटाचे प्रदर्शन होणे हा योगायोग आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Advertisement

हे ही वाचा : 'मनसेला सत्तेत बसवणार' राज ठाकरेंचा निर्धार, किता जागा लढणार ते ही सांगितले

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आपण 200 ते 225 जागा लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले आहे. मनसेने आपले उमेदवार जाहीर करण्यासही सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी दिवाळीनंतर निवडणुका होतील अशी शक्यता आहे. दसऱ्यापूर्वी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा हा एक नवा मार्ग राज ठाकरेंनी निवडला असावा असा एक तर्क लढवला जात आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडीतने म्हटले की, ''प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.''

Advertisement
Topics mentioned in this article