बॉलिवूडच्या या सिनेमांची पाकिस्तानात हवा; टॉप 10 मध्ये 7 सिनेमांचा समावेश

नेटफ्लिक्सने 20 मे पासून 26 मे पर्यंत पाहिल्या गेलेल्या कंटेटची लिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये टॉप 10 सिनेमांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय सिनेमे आणि शोज् पाकिस्तानात देखील लोकप्रिय आहेत. पाकिस्तानात हिंदीसह प्रादेशिक भाषेतील सिनेमे आणि कार्यक्रमांना देखील खूप पंसती मिळत आहे. नेटफ्लिक्सच्या टॉप 10 लिस्टमधून ही बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. नेटफ्लिक्सने आपल्या साईटवर याची लिस्ट शेअर केली आहे. पाकिस्तानी नागरिकांना नेटफ्लिक्सवर काय पाहायला आवडतं याचा देखील अंदाज यातून येत आहे. पाकिस्तानमध्ये भारतातील सात सिनेमे आहेत, ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेटफ्लिक्सने 20 मे पासून 26 मे पर्यंत पाहिल्या गेलेल्या कंटेटची लिस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये टॉप 10 सिनेमांचा समावेश आहे. नेटफ्लिक्सकडून अनेक देशांनुसार ही लिस्ट शेअर केली जाते. त्यानुसार पाकिस्तानात जे 10 सिनेमे सर्वाधिक पाहिले गेले, त्यातील 7 सिनेमे बॉलिवूडचे आहेत. 

कोणते सिनेमे पाकिस्तानात सर्वाधिक पाहिले गेले?

कृती सेनन, करिना कपूर, तब्बू यांचा 'क्रू' हा सिनेमा पाकिस्तानात सर्वाधिक पाहिला गेला.  त्यानंतर लापता लेडिज हा सिनेमा सर्वाधिक पाहिला गेला. जो लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अजय देवगन, आर माधवन यांचा शैतान हा सिनेमा पाहिला गेला.  

(नक्की वाचा- साऊथ सुपरस्टार NBKची सटकली; स्टेजवरच अभिनेत्रीला ढकललं, पाहा VIDEO)

थलापती विजयचा लिओ सिनेमा लिस्टमध्ये सहाव्या स्थानावर आहे. शाहरुख खानचा डंकी सिनेमा या लिस्टमधअये सातव्या क्रमांकावर आहे. त्यांनतर रणबीर कपूरचा अॅनिमल सिनेमा आठव्या क्रमांकावर आहे. तर ट्वेल्थ फेल हा सिनेमा देखील पाकिस्तानात हिट होत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article