Orry Drug Case Update : मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला (Orhan Awatramani) 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स पाठवले आहे.हे समन्स अँटी-नार्कोटिक्स सेलच्या वतीने जारी करण्यात आले आहे.ओरीला उद्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अँटी-नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. दाऊद इब्राहिम टोळीतील प्रमुख सदस्य,फरार ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा निकटवर्तीय सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख यांनी मुंबई आणि दुबईमध्ये रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले होते, अशी माहिती नुकतीच समोर आली होती.
शेखच्या पार्टीत नोरा-श्रद्धा कपूर सहभागी
दाऊद इब्राहिम टोळीतील प्रमुख सदस्य,फरार ड्रग्ज किंगपिन सलीम डोला याचा निकटवर्तीय सहकारी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख यांनी मुंबई आणि दुबईमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन केले होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने सांगितले की शेखने या पार्ट्यांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये कथितरित्या दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह,अभिनेत्री नोरा फतेही,श्रद्धा कपूर आणि तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर सहभागी झाले होते.
नक्की वाचा >> 30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल
पार्टीत कोण-कोण होते?
पोलिसांनी मुंबईतील एका न्यायालयासमोर सादर केलेल्या रिमांड अर्जात असेही म्हटले आहे की चित्रपट निर्माते अब्बास-मस्तान यांच्यासह रॅपर लोका, ओरी आणि एनसीपी नेते जीशान सिद्दीकी यांसारख्या काही इतर व्यक्ती देखील कथितरित्या या पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या.