Husband-Wife Viral News : आयुष्य कधी,कोणत्या वळणावर कोणाचा खरा चेहरा दाखवेल,हे सांगता येणार नाही.एक व्यक्ती,जो कधी 30 लाखांच्या पगाराचा, 5-5 बंगल्यांचा आणि शानदार जीवनशैलीचा मालक होता, तो आज व्हीलचेअरवर बसून फक्त एवढेच म्हणतोय की,'पैसा काही कामी आला नाही,फक्त माणूसच उपयोगी आला. बहादूरगढचे रहिवासी असलेले हे सीए एका फुटवेअर कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. ब्रेन हॅमरेजमुळे परिस्थिती अचानक बिघडली आणि त्यांच्यावर सहा मोठी ऑपरेशन करावी लागली.एक वेळ अशी आली की, ते ना बोलू शकत होते,ना लोकांना ओळखू शकत होते. स्मृतीभ्रंशापासून असंख्य अडचणी संकटांचा त्यांना सामना करावा लागला. या संकटाच्या काळात त्यांना जवळच्या नातेवाईकांनी खरे रंग दाखवले, ज्यामुळे ते आणखीनच कोलमडून गेले.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स'वर हा व्हिडिओ @BalkaurDhillon या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय,‘सीए आहे,पाच बंगल्यांचा मालक आहे,तीस लाख रुपये पगार होता..आजारी पडलो तर पत्नीने खोटे बोलून अनाथाश्रमात सोडून पळ काढला.पैसा काही कामाचा नाही,समाजसेवाच कामी येते.' 4 मिनिटे 16 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 63 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
“I was a CA earning ₹30 lakh a year… owned 5 properties… a life everyone thought was ‘settled'. Then a brain hemorrhage changed everything. While I fought for my life, my wife lied and abandoned me! Money doesn't matter now! “
— Dinesh Wadera (@dineshwadera) November 16, 2025
He spent 3 years in an orphanage, rebuilding… pic.twitter.com/hjtFWR0PnH
नक्की वाचा: गौतम गंभीरला गाशा गुंडाळावा लागणार? प्रशिक्षकपदावरून होणार उचलबांगडी? सौरव गांगुलीचं 'ते' विधान खूप चर्चेत
"पत्नीने मला एकटं सोडलं, मुलांनीही पाठ फिरवली..."
त्या व्यक्तीने व्हिडीओत सांगितलं की,"माझी पत्नी मला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने इथे सोडून गेली होती. ती म्हणाली आपण मेदांता हॉस्पीटलमध्ये चाललो आहोत. यानंतर तिने मला इथे सोडून दिलं. कुटुंबातील लोक भेटायला आले, पण माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितले,"मी आता तुला सांभाळू शकणार नाही.आजारपणामुळे नाती तुटली, शारिरीक वेदना तर होत्याच मनालाही प्रचंड वेदना झाल्या. या व्यक्तीने म्हटलंय की बायकोने आपली साथ सोडलीच शिवाय ती मुलांनाही घेऊन गेली. दोन्ही मुलांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याचं या व्यक्तीला भयंकर दु:ख झालंय.
नक्की वाचा: 'या' दिग्दर्शकाचं अख्ख कुटुंब आहे इंडियन आर्मीत! 'ऑपरेशन सिंदूर'वर बनवणार मोठा सिनेमा,पण फक्त एका अटीवर..
या व्यक्तीने म्हटले की, "मी जेव्हा आलो तेव्हा माझी परिस्थिती खूपच वाईट होती.मी बोलूही शकत नव्हतो.मला काही समजत नव्हते, लोकांना ओळखू शकत नव्हतो. मग या संस्थेतील लोकांनी मदत केली. माझी काळजी घेतली.जेव्हा माझे स्वतःचे कुटुंब माझ्यापासून दूर जात होते तेव्हा या संस्थेतील लोकांनी माझा सांभाळ केला. काही दिवसांनी मला पुन्हा बोलता येऊ लागले, स्मृतीभ्रंशही दूर झाला. लकव्यामुळे एका हाताची आणि एका पायातील ताकद गेली आहे. पण बाकी माझी तब्येत सुधारली आहे, मी व्हीलचेअरवरून फिरू लागलो आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world