साऊथ सुपरस्टार NBKची सटकली; स्टेजवरच अभिनेत्रीला ढकललं, पाहा VIDEO

साऊथ सुपरस्टार नंदमुरी बालकृष्णन (NBK) सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. स्टेजवर एका अभिनेत्री धक्का दिल्यामुळे सध्या एनबीके नेटिझन्सच्या निशाण्यावर आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

तेलुगू सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता नंदमुरी बालकृष्णन (NBK) सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. स्टेजवर एका अभिनेत्री धक्का दिल्यामुळे सध्या एनबीके नेटिझन्सच्या निशाण्यावर आहेत. अभिनेत्रीसोबत त्यांनी केलेलं हे गैरवर्तन अनेकांना पटलेलं नाही. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्टेजवर अनेकजण उपस्थित आहेत. त्यानंतर नंदमुरी स्टेजवर येतात आणि तिथे उभे राहण्यासाठी आधीच स्टेजवर असलेल्या अभिनेत्रींना थोडं सरकायला सांगतात. मात्र एक अभिनेत्री थोडीच सरकते, ज्यामुळे त्यांना नीट उभं राहण्यासाठी जागा नसते. त्यामुळे संतापलेल्या नंदमुरींनी अभिनेत्रीला जोरदार धक्का मारला.

अचानक घडलेल्या या घटनेनंतर अभिनेत्री देखील स्वत:ला सावरत हसू लागते. मात्र अभिनेत्रीकडे हसण्याशिवाय काही पर्याय देखील नसल्याचं दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्याला काय उत्तर देणार, असं देखील तिला वाटलं असेल. 

nandamuri balakrishna

कोण आहेत नंदमुरी बालकृष्णन?

मिळालेल्या माहितीनुसार, एनबीके गँग्स ऑफ गोदावरी सिनेमाच्या प्री रिलीज इव्हेंटमध्ये आले होते. नंदमुरी यांची साऊथचे सुपरस्टार म्हणून ओळख आहे. एनबीके यांचे वीर सिम्हा रेड्डी, भगवंत केसरी, अखंडा आणि लेजेंड हे सिनेमे प्रचंड गाजले. नंदमुरी हे एनटी रामाराम यांचे पुत्र आणि ज्युनियर एनटीआरचे काका आहेत. नंदमुरी टीडीपीचे आमदार देखील आहेत. 

Advertisement

Actress Anjali

ती अभिनेत्री कोण? 

नंदमुरी यांनी ज्या अभिनेत्रीला धक्का मारला तिचं नाव अंजली आहे. अंजलीने अनेक तामीळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 2006 मध्ये तिने करिअरची सुरुवात केली होती. सध्या अंजली तिच्या गँग्स ऑफ गोदावरी सिनेमामुळे चर्चेत आहे.  

Topics mentioned in this article