NDTV Marathi Entertainment Awards 2025: महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या एनडीटीव्ही मराठीतर्फे मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा पाडला. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. एनडीटीव्ही मराठीकडून पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीने फुलवंती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. त्यासोबतच ओटीटीमध्ये मानवत मर्डर्स या थरारक वेबसिरीजने सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचे मानांकन मिळवले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मोहन आगाशे, सचिन पिळगावकर, यांच्यासह रितेश देशमुख, प्राजक्ता माळी, रुपाली भोसलेंसह, राज्याचे नेते आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही हजेरी लावली होती. या सोहळ्यामध्ये लेजेंडरी मराठी स्टार म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव करण्यात आला तर मराठी आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सचिन पिळगावकर यांना सन्मानित करण्यात आले.
पाहा ओटीटी आणि मालिकेतील सर्वात्कृष्ट अवॉर्ड्स:
सर्वोत्कृष्ट वेबसिरीज (लंपन, सोनी लीव)
सर्वोत्कृष्ट नायक (ओटीटी): मकरंद अनासपुरे (मानवत मर्डर्स)
सर्वोत्कृष्ट नायिका (OTT) सोनाली कुलकर्णी ( मानवत मर्डर्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (OTT मालिका) निपुण धर्माधिकारी (लंपन)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (टीव्ही मालिका) अक्षय मुडवाडकर (मालिका जय जय स्वामी समर्थ)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टीव्ही मालिका) जुई गडकरी (मालिकाः ठरलं तर मग)
सर्वोत्कृष्ट मालिकाः महाराष्ट्राची हास्यजत्रा
सर्वोत्तम टीव्ही शो (नॉन फिक्शन): पारु (झी मराठी)
सर्वोत्कृष्ट निवेदक: सिद्धार्थ चांदेकर (मी होणार सुपरस्टार, छोटे उस्ताद)
खास विशेष पुरस्कार, दिग्गजांचा सन्मान...
लेजेंडरी मराठी स्टार: अशोक सराफ
मराठी आयकॉन ऑफ द इयर: सचिन पिळगावकर
एंटरटेनर ऑफ द इयर: रितेश देशमुख
मोस्ट स्टायलिश ऑफ द इयरः सई मांजरेकर
सोशल मीडिया पर्सनॅलिटी ऑफ द इअर: शिव ठाकरे
व्हायरल सेंशेन ऑफ द इअर: संजू राठोड (गुलाबी साडी)
पर्सनॅलिटी ऑफ द इअर: शरद केळकर
पर्सनॅलिटी ऑफ द इअर: सई ताम्हणकर
रिअॅलिटी शो स्टार ऑफ द इअर: निक्की तांबोळी
ट्रेल ब्लेझर ऑफ द इअर (उपेंद्र लिमये)
ब्लॉकबस्टर हिरो ऑफ द इयर: स्वप्नील जोशी
NDTV Marathi Entertainment Awards 2025 : अशोक सराफ, सचिन, सोनाली कुलकर्णीसह दिग्गजांचा सन्मान