जाहिरात

NDTV Marathi ENT Awards 2025: एनडीटीव्ही मराठी पुरस्कार सोहळ्यात 'फुलवंती'ची बाजी! पाहा सर्व विजेत्यांची यादी....

NDTV Marathi Entertainment Awards 2025: मराठी सिने जगतातील नावाजलेले चित्रपट निर्माते, कंटेंट निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलावंतांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

NDTV Marathi ENT Awards 2025:  एनडीटीव्ही मराठी पुरस्कार सोहळ्यात 'फुलवंती'ची बाजी! पाहा सर्व विजेत्यांची यादी....

NDTV Marathi Entertainment Awards 2025: एनडीटीव्ही मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा आज पार पडला. NDTV नेटवर्कची मराठी वृत्तवाहिनी असलेल्या एनडीटीव्ही मराठीकडून मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांना गौरवण्यात आले. मराठी चित्रपट, टेलिव्हिजन ओटीटी कलावंत तसेच मराठी सिने जगतातील नावाजलेले चित्रपट निर्माते, कंटेंट निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलावंतांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या पुरस्कार सोहळ्याला मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, मोहन आगाशे, सचिन पिळगावकर, यांच्यासह रितेश देशमुख, प्राजक्ता माळी, रुपाली भोसलेंसह अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सिनेसृष्टीतील सेलिब्रेटींच्या एन्ट्रीने आणि उपस्थितीने एनडीटीव्ही मराठीचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा आगळावेगळा आणि अविस्मरणीय ठरला. 

Nashik News: कृषिमंत्री कोकाटेंना तात्पुरता दिलासा! 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती; कोर्टाने काय म्हटलं?

पाहा संपूर्ण पुरस्कारांची यादी:

सर्वोत्कृष्ट चित्रपट: पाणी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आदिनाथ कोठारे (पाणी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता :  गश्मीर महाजनी (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट अभिनेता(सहकलाकार): मिलींद शिंदे (घात), क्षितीज दाते (धर्मवीर 2)

Latest and Breaking News on NDTV

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: प्राजक्ता माळी (फुलवंती)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहकलाकार): नम्रता संभेराव (नाच ग घुमा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: सचिन पिळगांवकर आणि आदर्श शिंदे (डम डम डम डम डमरु बाजे: नवरा माझा नवसाचा 2)
 सर्वोत्तम पार्श्वगायक (पुरुष विभाग)  - अभय जोधपुरकर (नवसाची गौरी माझी, चित्रपट - घरत गणपती)
सर्वोत्तम म्युझिक अल्बम: संकेत साने (नाच ग घुमा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: वैशाली माडे (मदनमंजिरी, फुलवंती)

सर्वोत्कृष्ट गीतकार: वैभव जोशी ( काय चुकले सांग ना,  सिनेमा: जुने फर्निचर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार: अविनाश विश्वजीत (सिनेमा धर्मवीर 2)
सर्वोत्तम कथानक: आदिनाथ कोठारे, नितीन दीक्षित (सिनेमा: पाणी)
सर्वोत्तम पटकथा: मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी (सिनेमा नाच गं घुमा)

Latest and Breaking News on NDTV

सर्वोत्तम छायाचित्रण: महेश लिमये (चित्रपट: फुलवंती)
सर्वोत्तम कला दिग्दर्शन: एकनाथ कदम (फुलवंती)
सर्वोत्तम वेशभूषा: उपासना सांगळे (सत्यशोधक)सर्वोत्कृष्ट वेबसिरीज (लंपन, सोनी लीव)
सर्वोत्कृष्ट नायक (ओटीटी):  मकरंद अनासपुरे (मानवत मर्डर्स)

NDTV Marathi Entertainment Awards 2025 LIVE: अशोक सराफ, सचिन, सोनाली कुलकर्णीसह दिग्गजांचा सन्मान