
प्रांजल कुलकर्णी, नाशिक: 1995 मधील प्रकरणात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. या प्रकरणाचे अपील काळ पूर्ण होईपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यावरील शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज करुन लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी आव्हान दिले होते, त्याप्रकरणाची आज सुनावणी झाली असून या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडली. माणिकराव कोकाटे यांचे वकिल अविनाश भिडे यांनी राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला देत ही शिक्षा चुकीचे असल्याचे म्हटले. 995 ते 2025 पर्यंत माणिकराव कोकटेंकडून गुन्हेगारी कृत्य नाही. सलग अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केले, त्यामुळे कोकाटे यांच्या विरोधात दिलेला कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
या सुनावणीनंतर कोर्टाने महत्त्वाचा निकाल देत कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. अपील काळ पूर्ण होईपर्यंत या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. दरम्यान, उद्या माणिकराव कोकाटे यांच्या या शिक्षेबाबत आणखी एक महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. एखाद्या एमएलए किंवा पार्लमेंटला दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्पॅलिफाय ठरतात, त्यावर ही सुनावणी असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world