जाहिरात

Neha Kakkar: नेहा कक्कर 3 तास उशीराने पोहोचली लाइव्ह शोमध्ये, प्रेक्षकांनी लावला वेगळाच सूर म्हणाले Go Back

Neha Kakkar मेलबर्नमध्ये लाइव्ह शोदरम्यान बॉलिवूड गायिका नेहा कक्करला प्रेक्षकांच्या रागाचा सामना करावा लागला.

Neha Kakkar: नेहा कक्कर 3 तास उशीराने पोहोचली लाइव्ह शोमध्ये, प्रेक्षकांनी लावला वेगळाच सूर म्हणाले  Go Back
नेहा कक्कर रडल्याने ट्रोल

Neha Kakkar: लोकप्रिय बॉलिवूड गायिका नेहा कक्करची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मेलबर्नमधील लाइव्ह कॉन्सर्टमध्ये नेहा तब्बल तीन तास उशीराने पोहोचली. रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये नेहा स्टेजवर रडताना आणि वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना धन्यवाद म्हणत असल्याचे दिसतंय. पण कार्यक्रमातील प्रेक्षक नेहा कक्करच्या रडण्यावर चिढल्याचे दिसतंय. दुसरीकडे सोशल मीडियावरही नेहाला जबरदस्त ट्रोल केले जात आहे. 

व्हिडीओमध्ये नेहा कक्कर म्हणतेय की, मित्रांनो तुम्ही खूप चांगले आहेत. तुम्ही धीर बाळगला. तुम्ही सर्व खूप वेळापासून वाट पाहत आहात. मला माझाच राग येतोय. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणालाही इतका वेळ वाट पाहायला लावली नाही. तुम्ही कधीपासून वाट पाहताय. मला माफ करा. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही संध्याकाळ मला कायम लक्षात राहील. आज तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी इतका मौल्यवान वेळ काढला आहे. मी शब्द देते की मी तुम्हाला डान्स करायला भाग पाडेन.  

Neha Kakkar crying for being 3 hrs late at a Melbourne show
byu/offensive-but-true inBollyBlindsNGossip

पण कार्यक्रमातील प्रेक्षकांचा सूर काही वेगळाच होता. प्रेक्षक नेहाला 'गो बॅक - गो बॅक' असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला. सोशल मीडियावरही नेहाला ट्रोल केले जातंय. मेलबर्नपूर्वी नेहाने सिडनीमध्ये परफॉर्म केले होते, याचे पोस्टही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. दरम्यान नेहाने गायलेले बद्री की दुल्हनिया, सनी सनी, कोका कोला, गर्मी, गली गली यासारखी गाणी गाजली आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: