बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने देशभरात एकच खळबळ उडाली होती. सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन मुन्नवर फारुकीला देखील अशीच धमकी मिळाली होती. आता गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
बाबा बुढा दलाचे निहंग मानसिंग अकाली याने एका व्हिडीओद्वारे ही धमकी दिली आहे. नेहा आणि तिचा पती रोहनप्रीत यांनी आपली वागणूक सुधारली नाही तरी त्यांना धडा शिकवला जाईल, अशी धमकी व्हिडीओद्वारे दिली आहे.
After 'Kulhad Pizza' couple (Sehaj Arora and Gurpreet Kaur), Nihang Singh threatens Neha Kakkar for making social media reels with husband Rohanpreet Singh#Punjab #NehaKakkar pic.twitter.com/ksgq3xP7UT
— Ishani K (@IshaniKrishnaa) October 13, 2024
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग या गायिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघेही अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बाबा बुढा दलाच्या निहंग मानसिंग अकालीकडून या फोटो आणि व्हिडिओंवरुनच धमकी मिळाली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना निहंग मानसिंगने म्हटले आहे की, नेहा कक्कर तिचा पती रोहनप्रीतसोबत लोकांसमोर अश्लील कृत्ये करत असतात. दोघांनीही सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करू नका. लोकांसमोर आक्षेपार्ह कृत्य करून तुम्हाला काय सांगायचे आहे? थोडी लाज बाळगा.
सोशल मीडियावर अश्लील कंटेंट टाकणाऱ्यांना आम्ही आधी प्रेमाने समजावून सांगू आणि नंतर त्यांना धडा शिकवू. यासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत चांगले गायक असतील तर त्यांनी चांगले काम केले पाहिजे. अशा वृत्तीमुळे समाजात चुकीचे मेसेज जातो, असं मानसिंगने म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world