जाहिरात

Nehha Pendse : 'मी एग्ज फ्रीज केले होते, पण आता...'; मराठीतील बोल्ड अभिनेत्रीच्या Bold विधानाने चाहते संतापले

सोशल मीडियावर नेहा पेंडसेविरोधात अत्यंत वाईट शब्दात टीका केली जात आहे. दुसरीकडे अनेकांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Nehha Pendse : 'मी एग्ज फ्रीज केले होते, पण आता...'; मराठीतील बोल्ड अभिनेत्रीच्या Bold विधानाने चाहते संतापले

Nehha Pendse doesn't want to be a mother : अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. त्या वैयक्तिक आयुष्यात काय खातात, कसे कपडे घालतात ते त्यांच्या बॅगेत काय काय असतं अशा प्रकारचे विविध प्रश्न चाहत्यांना पडत असतात. बऱ्याचदा काही अभिनेत्री आपली भूमिका बोल्डपणे मांडतात. मात्र प्रत्येक वेळी त्यांची भूमिका चाहत्यांना पटेल असं नाही. परिणामी अभिनेत्रींना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 


'मी स्वत:ला आईच्या रुपात पाहत नाही' l (Nehha Pendse doesn't want to be a mother)

मराठीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या अशा वक्तव्यावरुन ट्रोल झाली आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नेहा पेंडसे आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलत होती. २०२० मध्ये नेहा पेंडसे शार्दुल सिंह व्यास याच्याशी विवाहबंधनात अडकली. शार्दुल हा उद्योगपती आहे. शार्दूलचा यापूर्वी दोन वेळी घटस्फोट झाला असून नेहा पेंडसेंसोबत त्याने तिसरं लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतरही नेहा पेंडसेने मूल होण्याचा विचार केला नाही. याबाबत बोलताना तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं, मी माझे एग्ज फ्रीज केले होते. लग्नानंतर एका क्षणाला मला आई व्हावं अशी इच्छा निर्माण झाली होती. मात्र काही कारणास्तव त्यावेळी मी आई होऊ शकले नाही. त्यानंतर मी एग्ज फ्रीज करण्याचं ठरवलं. मात्र नंतर मी त्या प्रक्रियेत निराश झाले. मात्र आता मला आई व्हायचं नाहीये. मला ती जबाबदारी नकोय. माझ्या आजूबाजूच्या अनेक महिलांची मूल होण्याबाबत घालमेल होते. कदाचित आता हे विधान खूप बोल्ड वाटेल. मात्र याचा खोल विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल, असंही ती पुढे म्हणाली. 

नक्की वाचा - आई-बाबांपासून लपवलं, शेवटी सर्जरी झाल्यानंतर...; राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सर, चाहते भावुक

नेहा पेंडसेचं करिअर...l Nehha Pendse Career 

नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नेहाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 'भाभीजी घर पर है', 'मे आय कम इन मॅडम?' आणि 'बिग बॉस १२' यांसारख्या प्रसिद्ध हिंदी मालिका/शोमध्ये तिने काम केलं आहे. नेहा पेंडसेने अनेक दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com