NDTV World Summit 2024 : ना 3 इडियट्स, ना बजरंगी भाईजान... करीनाच्या मते कोणत्या सिनेमात तिने बेस्ट काम केलं?

Kareena Kapoor : करीना कपूरने खुलासा केला आहे की कोणत्या चित्रपटात तिने सर्वोत्तम अभिनय केला. 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये तिने आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिल्याचे तिने सांगितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक सुरपरहिट सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. एक काळ असा होता की करीना कपूर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. करीना कपूरने तिच्या सर्वाधिक आठवणीत राहिलेल्या सिनेमाबद्दलही माहिती दिली. करीना आज एडीटीव्ही वर्ल्ड समिट 2024 मध्ये सहभागी झाली होती. 

यावेळी करीना कपूरने तिच्या कारकिर्दीबद्दल आणि तिच्या चित्रपटांबद्दल बरेच काही सांगितले. करीना कपूरने खुलासा केला आहे की कोणत्या चित्रपटात तिने सर्वोत्तम अभिनय केला. 'द बकिंघम मर्डर्स'मध्ये तिने आतापर्यंतचा सर्वोत्तम परफॉर्मन्स दिल्याचे तिने सांगितले. 

द बकिंघम मर्डर्सबद्दल बोलताना करीना कपूर म्हणाली, 'निर्माती म्हणून ती या चित्रपटाबद्दल खूप आनंदी आणि आत्मविश्वासू आहे. या चित्रपटात मी आतापर्यंतचा माझा सर्वोत्तम अभिनय दिला आहे. याशिवाय करीना कपूर इतरही अनेक गोष्टींबद्दल बोलली. द बकिंहम मर्डर्स सिनेमा हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. तर 40 कोटी बजेटचा हा सिनेमा आहे. 

करीनाची आवडते खाद्यपदार्थ

जेव्हा करीना कपूरला दिल्लीतील तिच्या आवडत्या रेस्टॉरंटबद्दल विचारण्यात आले तेव्हा बेबोने बुखाराचे नाव घेतले. खाण्याबाबत अधिक बोलताना करीनाने सांगितले की, याशिवाय ती चांदनी चौकातील पराठा गल्लीबद्दलही बोलली. मात्र अनेक वर्षांपासून ती तिथे गेली नाही. पण हे तिच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांबद्दल बोलताना, करिनाने छोले भटुरे, आलू पराठा आणि बिर्याणीची नावे घेतली.