VIDEO: 'आयर्न मॅन'च्या रुपात मराठी अभिनेता! मुंबईमधील रॅलीत फिर फिर फिरला, कोणीच ओळखले नाही

मराठमोळा अभिनेता मार्वल कॉमिक्सच्या लोकप्रिय सुपरहिरोच्या रुपात अवतरला. त्याने आयर्न मॅनच्या रुपात या रॅलीमध्ये सहभाग घेतला, त्याला या रुपात कोणी ओळखलेही नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Actor Pruthvik Pratap Iron man Look: नीट पेपर फुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबईमध्येही मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा विजयी रॅली व सभेचे आयोजन करण्यात आलं होते. या रॅलीमध्ये मुंबईमधील तरुण- तरुणी, पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी वेगवेगळ्या वेशभूषा, हातात घेतलेले पोस्टर्सनी चांगलेच लक्ष वेधले. अशातच आता या आंदोलनात मराठमोळा अभिनात आयरॉन मॅनच्या रुपात सहभागी झाला होता जो कोणाला ओळखताच आला नाही.

Song Story: एका गाण्याचा चमत्कार! ऐकताच मरणासन्न मुलाने उघडले डोळे ; 58 वर्षांपुर्वी 'या' गिताने केलेली जादू

आयर्न मॅनच्या लूकमध्ये मराठी अभिनेता! 

राज ठाकरे- उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत निघालेल्या मुंबईमधील तिरंगा विजयी रॅलीला अभूतपुर्व असा प्रतिसाद पाहायला मिळाला. या रॅलीमध्ये चिमुकल्यांसह तरुणाई, पालक अन् आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रॅलीमध्ये तरुणाईने क्रिएटिव्ह माईंडने बनवलेले पोस्टर्स, वेगवेगळी वेषभूषांनी सर्वांचे लक्ष वेधले. याच मोर्चामध्ये मराठमोळा अभिनेता मार्वल कॉमिक्सच्या लोकप्रिय सुपरहिरोच्या रुपात अवतरला. त्याने आयर्न मॅनच्या रुपात या रॅलीमध्ये सहभाग घेतला, त्याला या रुपात कोणी ओळखलेही नाही.

Advertisement

पृथ्वीक प्रतापचा स्वॅग!

आयर्न मॅनच्या रुपात अवतरेला हा अभिनेता म्हणजे हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप.. पृथ्वीक प्रताप आयर्न मॅनची खास हेल्मेट घालून या रॅलीमध्ये सहभागी झाला होता. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रतिक कांबळेने पृथ्वीकचा हा खास व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच अभिनेता पृथ्वीकनेही त्याच्या इन्टाग्रामवर या खास लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत, ज्यावर त्याच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. 

NEET Paper Leak: "मी स्वतः दोनदा नीट परीक्षा दिलीय!" अभिनेत्रीची भावुक पोस्ट; CJP आंदोलनाला पाठिंबा