जाहिरात

Gatari Amavasya : हिंदू संस्कृतीत 'गटारी अमावस्या' असा शब्दच नाही; श्रावणापूर्वी साजरा करतो त्याला काय म्हणतात? 

श्रावणाच्या महिनाभरात मांसाहार आणि मद्यपानास बंदी असते. त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी मद्यप्रेमी आणि मांसाहार प्रेमी यथेच्छ ताव मारतात.

Gatari Amavasya : हिंदू संस्कृतीत 'गटारी अमावस्या' असा शब्दच नाही; श्रावणापूर्वी साजरा करतो त्याला काय म्हणतात? 

Gatari Amavasya : 25 जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या साजरी करण्याची प्रथा आहे. श्रावणाच्या महिनाभरात मांसाहार आणि मद्यपानास बंदी असते. त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी मद्यप्रेमी आणि मांसाहार प्रेमी यथेच्छ ताव मारतात. घरोघरी नॉनव्हेचा स्वयंपाक केला जातो. पुढचा महिनाभर मांसाहार करता येणार नसल्याने नॉनव्हेज प्रेमी पोटभरून मांसाहार करतात. या या दिवशी अनेक गच्चींवर पार्टीही रंगताना दिसते. 

श्रावण महिन्यात धार्मिक आणि नैसर्गिक कारणामुळे मांसाहार केला जात नाही. या काळात मासे, प्राणी यांचा प्रजननाचा काळ असतो. भविष्यात चांगले मासे खाता यावेत म्हणून महिनाभर नॉनव्हेज वर्ज्य केलं जातं. याशिवाय या काळात वातावरण दमट असल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे मांसाहारासारखे जड पदार्थ खाणे टाळले जातात. 

What To Eat By Age : वयानुसार काय आणि किती खायला हवं? नेहमी फिट राहण्यासाठी डॉक्टरांकडून महत्त्वाच्या टिप्स...

नक्की वाचा - What To Eat By Age : वयानुसार काय आणि किती खायला हवं? नेहमी फिट राहण्यासाठी डॉक्टरांकडून महत्त्वाच्या टिप्स...


'गटारी अमावस्या' असा सणच नाहीये... (Gata Ahari Amavasya)

श्रावणापूर्वीच्या दिवसाला सर्वसाधारपणे गटारी अमावस्या म्हणण्याची पद्धत पाहायला मिळते. मात्र प्रत्यक्षात गटारी अमावस्या असा कोणताही सण आपल्या संस्कृतीत नाही. हा अपभ्रंश असल्याचं दिसून येतं. याचं मूळ नाव 'गतहारी' असं आहे. गत म्हणजे मागे राहिलेला हारी म्हणजे आहार... श्रावणात जो आहार घ्यायचा नाही अशा अर्थाने याला गतहारी अमावस्या म्हटलं जात असल्याचं सांगितलं जातं. मात्र आपल्याकडे या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्याला गटारी अमावस्या म्हणून लागले. 

गटारीत दारू पिण्याची पद्धत आहे, मात्र कधीतरी दारू पिणं सुरक्षित आहे का?
डॉ. सरीन यांचं म्हणणं आहे की, जर तुम्हाला अल्कोहोल घ्यायचं असेलच तर वर्षातून एकदा घ्या. त्या पेक्षा जास्त घेऊ नका. याची मात्रा प्रत्येक व्यक्तीच्या मेटाबॉलिज्म म्हणजेच शरीराच्या कार्यप्रणाली वर अवलंबून असते. पण याचा अर्थ असा नाही की थोडी मात्रा पूर्णपणे सुरक्षित आहे हे सांगायला ही ते विसरत नाहीत. 

जास्त अल्कोहोलमुळे काय होतं?
जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने लिव्हरला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. ते पुढील प्रमाणे 

  • फॅटी लिव्हर (Fatty Liver)
  • लिव्हरला सूज (Hepatitis)
  • सिरोसिस (Cirrhosis)
  • लिव्हर फेल्युअर (Liver Failure)
  • कॅन्सरचाही धोका

यामुळे हळूहळू लिव्हरच्या पेशी मरू लागतात. शिवाय ते लिव्हर काम करणं बंद करतं.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com