
रेवती हिंगवे, प्रतिनिधी
Pune News : येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला (Shravan Month) सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटन आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुढच्या आठवड्यात 25 जुलै, शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीचा हा शेवटचा रविवार असल्याने मद्यप्रेमी आणि मांसाहार प्रेंमींनी मटणाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
आज रविवारचा मुहूर्त साधत मटन खाण्यासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासून मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. पहाटे सहापासून पुणेकरांनी मटणाच्या दुकानाबाहेर भली मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे.
नक्की वाचा - Pune News : धरणे तुडुंब मात्र कोथरूड 4 दिवस कोरडेठाक, आंघोळीचे वांदे झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या
त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना महिनाभर, म्हणजे गणपती विसर्जन होईपर्यंत मटण आणि चिकन खाता येणार नाही. म्हणून आज रविवारचा दिवस साधत मटणावर ताव मारला जाणार आहे. यासाठीच शहरातील सर्व दुकानांबाहेर मटन आणि चिकन खरेदीसाठी आता पुणेकरांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. पुण्याच्या मटन मार्केट मधून आज जवळपास 3000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

दुकानांच्याबाहेर गर्दी असल्याने अनेकजण ब्लिंकिट, झेप्टो, स्वीगी इन्स्टामार्टसारख्या अॅपआधारित खरेदी करण्याचा पर्याय निवडतात. मात्र येथे मांसाहारासाधी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत असल्याचं दिसतंय. एक किलो मटणासाठी तब्बल 1230 रुपये आकारले जात असून गोदरेज रिव गुड चिकन ब्रेस्ट बोनलेस 400 ग्रॅम चिकनसाठी 246 रुपये आकारले जात आहे. याशिवाय चिकन करीसाठी 450 ग्रॅम चिकनची किंमत 170 रुपयांपर्यंत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world