Amitabh Bacchan On Shankar Mahadevan : राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांना ‘तारे जमीन पर', ‘मितवा' आणि 1998 मधील इंडी-पॉप अल्बम ‘ब्रेथलेस'साठी ओळखले जाते. त्यांनी गायलेल्या आणि कंपोज केलेल्या गाण्यांवर आजही लोक थिरकतात. अशा वेळी आज आम्ही तुम्हाला त्यांच्या एका अशा गाण्याबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवन यांना धमकी देत म्हटले होते की, “मी तुझं करिअर संपवून टाकेल”. खरंतर, शंकर महादेवन यांनी त्यांच्या फेमस ट्रॅक ‘कजरा रे'शी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय.
‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या ‘ऑल इंडिया महफिल' या पॉडकास्टमध्ये शंकर महादेवन यांनी सांगितलं की, एकदा रेकॉर्डिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना धमकीवजा इशारा दिला होता. शंकर महादेवन यांनी ‘कभी अलविदा ना कहना' चित्रपटातील कलाकारांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, “मला आठवतंय, अमिताभ बच्चन सर त्या वेळी ‘रॉक अँड रोल' गाण्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि आम्ही सेटवर गेलो होतो. तुम्हाला माहितीच आहे की अमिताभ सरांच्या तुलनेत माझं वजन खूप जास्त आहे. तरीदेखील, माझ्या वजनाकडे दुर्लक्ष करून त्यांनी मला उचललं कारण ते ‘कजरा रे' गाण्यामुळे खूप आनंदी होते. ते मनाने खूप चांगले आणि साधे आहेत. माझ्या गाण्याबद्दल त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणाले, ‘वाह! काय गाणं बनवलं आहे.'”
नक्की वाचा >> धर्मेंद्र की हेमा मालिनी, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? पैशांचा आकडा वाचून थक्कच व्हाल
कजरा रे गाण्याबाबत बोलताना शंकर महादेवन काय म्हणाले?
‘कजरा रे' गाण्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “हा एक वेगळाच अनुभव होता. माझ्यासाठी अमिताभ बच्चन यांचा ‘कजरा रे'साठी आवाज डब करणे हे खूप कठीण काम होते, कारण जावेद अली यांनी अभिषेक बच्चनसाठी गाणं गायलं होतं आणि त्यांच्या भागासाठी मी गायलं होतं. जेव्हा मी त्यांना एका फंक्शनमध्ये भेटलो, तेव्हा मी म्हटलं, ‘सर, कृपया येऊन तुमचा भाग डब करून घ्या. आम्हाला गाण्याची मिक्सिंग करायची आहे.' त्यानंतर त्यांनी मला विचारलं, ‘कोणतं गाणं?' आणि मी त्यांना सांगितलं, ‘कजरा रे.' मग त्यांनी विचारलं, ‘मी यात काय डब करू शकतो?' त्यावर मी म्हटलं, ‘सर, मी तुमच्या भागासाठी गाणं डब करण्यासाठी ठेवलेलं आहे.'”
नक्की वाचा >> प्रायव्हेट पार्ट आणि चेहऱ्यावर डाग! डायमंड गर्ल 'लव्ह जिहाद'ची शिकार? मुस्लिम BF रुग्णालयातून फरार अन् पुढे...
"‘झूम बराबर झूम' गाण्यासाठीही असंच केलं होतं"
या गाण्याचे शूटिंग अमिताभ बच्चन यांनी आधीच केले होते आणि त्यांना हे गाणं खूप आवडलं होतं. त्यानंतर त्यांनी मला म्हटलं, ‘नाही, हे गाणं असंच राहील. जर तू याला हात लावला तर बघ, मी तुझं करिअर बिघडवेन.' शंकर महादेवन यांनी सांगितलं की मला माहित होतं की ते हे मजेत बोलत होते. शंकर महादेवन पुढे म्हणाले की बिग बी यांनी त्यांना सांगितले होते की हे गाणं त्यांनी अजिबात हात लावू नये आणि त्यांच्या भागासाठी दुसऱ्या गायकाकडून डबिंग करू नये. त्यांनी सांगितले की अमिताभ बच्चन यांनी ‘झूम बराबर झूम' गाण्यासाठीही असंच केलं होतं. सांगायचं झालं तर ‘कजरा रे' हे गाणं ‘बंटी आणि बबली' या चित्रपटातील आहे, जो 2005 साली प्रदर्शित झाला होता. त्या वेळी हे गाणं प्रचंड हिट झालं होतं आणि आजही लोक या गाण्यावर थिरकतात. हे गाणं ऐश्वर्या राय, अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या वेळी ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न झालं नव्हतं.