यंदाच्या ऑस्कर 2025 मध्ये अनोरा चित्रपटाला पाच विभागात पुरस्कार मिळाले आहेत. देहविक्रय करणाऱ्या तरुणीच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मिकी मॅडिसन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्याशिवाय सीन बेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीही पुरस्कार मिळाला. त्याशिलाय सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले, सर्वोत्कृष्ट एडिटिंगसाठीही 'अनोरा'ने पुरस्कार पटकावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे 'अनोरा'ची कहाणी?
'अनोरा' चित्रपट एखाद्या परीकथेप्रमाणे वाटतो. चित्रपटातील मुख्य एनी नावाची भूमिका निभावणारी मिकी मॅडिसन एक स्ट्रिप क्लबमध्ये डान्सर आहे. ती मूळची रशियन आहे. मात्र ती अमेरिकेत राहते. तिला इंग्रजी बोलायला आवडतं. एनी एका श्रीमंत उद्योगपतीशी लग्न करते. जेव्हा ही बाब तिच्या आई-वडिलांना कळते तेव्हा ते रशियाहून न्यूयॉर्कमध्ये येतात आणि तिचं लग्न तोडण्याचा प्रयत्न करतात.
नक्की वाचा - Oscar 2025 : देहविक्रय करणाऱ्या महिलेच्या जीवनावरील 'अनोरा'चीच चर्चा, ऑस्कर पुरस्काराच्या विजेत्यांची संपूर्ण यादी
चित्रपटाबाबत काही खास गोष्टी...
अनोराचं चित्रीकरण एकूण 35 दिवसात पूर्ण झालं.
चित्रपटातील अनेक ठिकाणी खऱ्याखुऱ्या स्ट्रिपर्सना ठेवण्यात आलं आहे.
'अनोरा' ओटीटीवर कधी पाहता येईल?
सेक्स वर्करची कहाणी पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे दाखवणाऱ्या अनोरा चित्रपटाला 97 व्या ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतात प्रदर्शित झाला होता. अनोरा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर पाहता येणार आहे. अनोरा चित्रपट 17 मार्चपासून जियो हॉटस्टारवर पाहता येणार आहे.