'देख रहा है बिनोद...' हा डायलॉग आजही लोकांच्या तोंडात आहे. अत्यंत सर्वसामान्य व्यक्तिरेखा... गावातील वास्तव... मात्र त्यात ह्युमरचा टच आल्याने एक वेगळीच कलाकृती उभी राहते. 'पंचायत' वेब सीरिजच्या दोन्ही सीजनने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि ह्युमरवर आधारित सादरीकरण असतानाही विचार करायला भाग पाडलं.
अॅमेझॉन प्राइमवरील पंचायत वेब सीरिजच्या यशस्वी दोन सीजननंतर आता तिसऱ्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंचायतचा तिसरा सीजन कधी प्रदर्शित होणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.
नक्की वाचा - यंदाचं वर्ष भारतासाठी खास, पुण्यातील FTII विद्यार्थ्यांचा कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बोलबोला
सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या यादीत पंचायत तीनचं नाव घेतलं जातं. चाहते तिसरा सीजन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पहिल्या दोन सीजननंतर फुलेरा गावातील निर्माण होणारी नवी आव्हानं आणि संघर्षांमुळे 'पंचायत 3' एका रंजक मार्गावर वळण घेणार आहे. द वायरल फिव्हरद्वारा निर्मित 'पंचायत 3' वेब सीरिज दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केली आहे. नव्या सीजनचा प्रीमियर विशेषत: भारतात प्राइम व्हिडिओवर हिंदीत आणि तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्येही डब केलं जाणार आहे.
कधी होणार प्रदर्शित?
'पंचायत 3' मधील वेगवेगळ्या भूमिका या कलाकृतीची मजा अधिक वाढवतात. सचिव असो की प्रधानजी... या सीरिजमधील सहाय्यक व्यक्तिरेखांमधील ह्युमरदेखील प्रेक्षकांवर छाप सोडतात. आता प्राइम व्हिडिओने तिसऱ्या सीजनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. पंचायत येत्या काही आठवड्यात 28 मे रोजी अॅमेझॉन प्राइमच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.