जाहिरात

हेरा फेरी 3 सिनेमासमोर नवे संकट, परेश रावलने सोडला सिनेमा? बाबू भैयाने काय सांगितलं

Hera Pheri 3 : हेरा फेरी आणि या सिनेमाचे सीक्वेल भारतीय कॉमेडी सिनेमांमध्ये लोकप्रिय आहेत. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिकडीने सिनेरसिकांचे प्रचंड मनोरंजन केले. पण हेरा फेरी 3 सिनेमासमोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत.

हेरा फेरी 3 सिनेमासमोर नवे संकट, परेश रावलने सोडला सिनेमा? बाबू भैयाने काय सांगितलं
हेरा फेरी 3मध्ये परेश रावल दिसणार नाही?

Hera Pheri 3 Movie : हेरा फेरी सिनेमाची सीरिज भारतीय कॉमेडी सिनेमांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल या तिकडीने ऑनस्क्रीन धमाल केलीय. प्रेक्षक सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची आतुरतने वाट पाहत आहेत. हेरा-फेरी आणि हेरा-फेरी पार्ट 2 सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलंय. या दोन सिनेमांची लोकप्रियता पाहता वर्ष 2022मध्ये तिसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमामध्येही अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल ही तिकडी पुन्हा एकदा दिसणार असल्याचे म्हटलं गेले होते. पण रिपोर्ट्सनुसार, हेरा फेरीच्या तिसऱ्या पार्टपासून परेश रावल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडालीय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहली-अनुष्का शर्माचा मुलांसोबतचा नवा VIDEO VIRAL, वामिकाने वेधले लक्ष

(नक्की वाचा: Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहली-अनुष्का शर्माचा मुलांसोबतचा नवा VIDEO VIRAL, वामिकाने वेधले लक्ष)

बॉलिवूड हंगामा इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा परेश रावलला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानेही 'हो, हे खरंय' असे उत्तर दिले. सिनेमा आधीच कायदेशीर, वेळापत्रक आणि कलाकारांच्या अडचणींमध्ये अडकलाय. यातच परेश रावलने सिनेमातून माघार घेणे हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. परेश रावल साकारत असलेले बाबूभैया हे पात्र सिनेरसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हे पत्र श्याम (सुनील शेट्टी) आणि राजू (अक्षय कुमार) यांच्यातील एक मजबूत दुवा आहे.

स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले

(नक्की वाचा:  स्वतःच्याच लग्नात नववधूचा काजोलच्या गाण्यावर धमाकेदार डान्स! पाहणाऱ्यांच्या अंगावर आले शहारे, लग्नच विसरले)

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, परेश रावल यांना हा निर्णय निर्मात्यांसह झालेल्या मतभेदांच्या कारणांमुळे घ्यावा लागला. अक्षय कुमारने देखील याच कारणांमुळे सिनेमा सोडला होता, पण निर्मात्यांशी सहमती झाल्यानंतर त्याने निर्णय मागे घेतला. जेव्हा अक्षयने सिनेमा परतण्याबाबत दुजोरा दिला तेव्हा दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि सिनेमाचे दिग्दर्शन न करण्याचे कारण स्पष्ट केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com