
Groom Dance Video Viral: बदलत्या लाइफस्टाइलनुसार लग्नसोहळ्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात. पूर्वी नववधू लाजत लाजत लग्नमंडपात पोहोचत असे. नवरामुलगा देखील काहीसा लाजून पत्नीच्या गळ्यात हार घालत असे. पण आता ट्रेंड बदलत आहेत आणि लग्नसोहळ्यामध्येही लोक रील्स तयार करू लागले आहेत. नववधू डान्स करत लग्नमंडपात एण्ट्री घेते आणि नवरामुलगा सुद्धा तिच्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर ताल धरतो. नुकतेच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवऱ्यामुलीने तिच्या पतीचे अनोख्या पद्धतीने स्वागत केल्याचे पाहायला मिळालं. बॉलिवूडमधील गाजलेल्या गाण्यांवर डान्स करत तिने नवऱ्याचे स्वागत केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवऱ्यामुलीने काजोलच्या गाण्यावर केला डान्स
Anjali kalosiya नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, लग्नसोहळ्यातील माझी एण्ट्री. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरामुलगा घोड्यावर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला आणि लाल रंगाचा लेहंगा घालून-सुंदर मेकअप करुन पाहुण्यांनी गर्दी केलेल्या लग्नमंडपात नववधूने तिच्या नवऱ्याचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. ब्लॉकबस्टर सिनेमा 'कुछ कुछ होता है' मधील 'साजन जी घर आए' गाण्यावर तिने ठेका धरला. नववधूने एखाद्या ट्रेंड डान्सरप्रमाणे कमाल डान्स केला आणि तिच्या डान्स स्टेप्सने कमाल केली.
(नक्की वाचा: परेश रावल यांनी सांगितला मराठी माणूस आणि त्याच्या ताकदीचा किस्सा)
युजर्संच्या भन्नाट प्रतिक्रिया
नववधूचा हा व्हिडीओ सात लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय आणि 46 हजार लोकांनी लाइक केलेय. लाइक्ससोबतच युजर्सकडून कमेंट बॉक्समध्ये एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देखील करण्यात आल्या आहेत. एका युजरने लिहिलंय की, वेडेपणाचीही हद्द असते. दुसऱ्याने लिहिलंय की, जेव्हा नवरा आणि लेहंगा दोन्ही नवरीच्या आवडीचे असते तेव्हा असे घडते. आणखी एका युजरने लिहिलंय की, स्वतःच लग्न आहे, हे ती विसरल्याचं दिसतंय.
(नक्की वाचा: Ashi Hi Banwa Banwi Part 2: 'अशी ही बनवाबनवी पार्ट 2 येणार? वाचा सचिन पिळगांवकर काय म्हणाले)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world