Phullwanti Official Trailer: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित फुलवंती सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला' अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी 'फुलवंती' 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फुलवंती' सिनेमाचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये 'फुलवंती'च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यातील संवाद खिळवून ठेवतील. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कांदबरीवर साकारण्यात आलेला सिनेमा 'फुलवंती' सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक आतूर झाले आहेत.
(नक्की वाचा: Phullwanti Title Track: फुलवंती सिनेमातील टायटल ट्रॅक रिलीज, प्राजक्ता माळी रंभा जणू देखणी)
प्राजक्ताने सिनेमाबाबत व्यक्त केला हा विश्वास
उत्तम कथानक, नृत्य-संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता; यांचा सुंदर मिलाफ या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. "मराठी सिनेसृष्टीत नेहमीच उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मीही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय, याचा मला आनंद आहे. प्रादेशिक सिनेमे आशयघन असतात, ही बाब मला फार आवडते. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीच्या कलाकारांची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ, संवेदनशील दिग्दर्शन आणि वेगळ्या धाटणीचा तरीही कौटुंबिक असणारा 'फुलवंती' सिनेमा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडेल",असा विश्वास प्राजक्ताने व्यक्त केला.
(नक्की वाचा: Paani Movie Trailer : 'पाणी' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, मराठवाड्यातील पाणीटंचाईसाठी झगडणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा)
कला आणि बुद्धिमत्तेतील युद्ध
'फुलवंती' (Phullwanti Official Trailer) ही देशभर किर्ती असलेली नर्तिका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचे पुण्यातील पेशवे दरबारात येणे होते. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर फुलवंतीच्या (Phullwanti) जीवनामध्ये अनपेक्षित वळण प्राप्त येते. नृत्यांगना फुलवंती आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांच्यातील पैज आणि आव्हानाची कहाणी सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. कला आणि बुद्धिमत्तेतील युद्ध यामध्ये रंगणार आहे.
(नक्की वाचा: Phullwanti Song: लावण्यवती मदनमंजिरी प्राजक्ता माळी करणार मनमोहक अदांनी घायाळ)
तगडी स्टारकास्ट
सिनेमाध्ये प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे, क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर अशा कलाकारांची फौज दिसणार आहे.
सिनेमाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडेने केले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक,अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत.