
Phullwanti Song: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आगामी सिनेमा 'फुलवंती'मधील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामध्ये प्राजक्ताने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे. सध्या सर्वत्र 'फुलवंती' सिनेमाचीच चर्चा सुरू आहे. या सिनेमातील 'मदनमंजिरी' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली 'फुलवंती' कादंबरी चित्रपट रूपात 11 ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे.
अशी मी - मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी
अशी मी - मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी
(नक्की वाचा: आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, Hashtag Tadev Lagnam मध्ये दिसणार सुबोध-तेजश्रीची फ्रेश जोडी)
अशी ठसकेबाज शब्दरचना गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांची केली आहे तर वैशाली माडे यांनी हे गाणे गायले आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचे तर नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे.
हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं ठरू शकते. या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना खूप मजा आल्याचे वैशालीने सांगितले. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल. प्राजक्ताच्या कमाल नृत्यामुळे हे गाणं अधिकच सुंदर दिसत आहे.
येत्या 11 ऑक्टोबरला फुलवंती सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करत आहेत. सिनेमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे.
(नक्की वाचा: Phullwanti Title Track: फुलवंती सिनेमातील टायटल ट्रॅक रिलीज, प्राजक्ता माळी रंभा जणू देखणी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world