Gulzar Jnanpith Award : 90 वर्षीय गुलजार यांना ज्ञानपीठ प्रदान; भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने केलं सन्मानित

आरोग्यासंबंधित कारणामुळे गेल्या आठवड्यात नवी दिल्लीतील आयोजित कार्यक्रमात ते सामील होऊ शकले नव्हते. त्यामुळे गुलजारांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसिद्ध कवी-गीतकार गुलजार यांना वांद्रेतील त्यांच्या निवासस्थानी भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान 58 वा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आलं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांना या बहुमानाने सन्मानित करण्यात आलं. आरोग्यासंबंधित कारणामुळे गेल्या आठवड्यात नवी दिल्लीतील आयोजित कार्यक्रमात ते सामील होऊ शकले नव्हते. त्यामुळे गुलजारांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतीय ज्ञानपीठचे ट्रस्टी मुदित जैन, माजी सचिव धर्मपाल आणि महाप्रबंधक आर एन तिवारीसह इतर सदस्यांच्या उपस्थितीत गुलजार यांना प्रशस्ती पत्रकर आणि 11 लाखांचं मानधन देण्यात आलं. याशिवाय वाग्देवी सरस्वतीची कांस्य प्रतिमाही प्रदान करण्यात आली. 

नक्की वाचा - Entertainment news: अनुराग कश्यपच्या मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, तरुण अभिनेत्याने पुढे केला मदतीचा हात

गुलजारांचा अन्य पुरस्कारांनीही गौरव...
गुलजाराचा भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी गुलजारांचे जावई गोविंद संधू, चित्रपट निर्माता विशाल भारद्वाज, त्यांची पत्नी रेखा आणि काही साहित्यिक उपस्थित होते. यापूर्वी गुलजार यांना 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 2004 मध्ये पद्मभूषण, 2008 मध्ये स्लमडॉग मिलियनेरमधील जय हो या गीतासाठी अकादमी पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कार, भारतीय चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी 2013 मध्ये दादा साहेब फाळके पुस्कार मिळाला आहे. 

Advertisement