जाहिरात

Entertainment news: अनुराग कश्यपच्या मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, तरुण अभिनेत्याने पुढे केला मदतीचा हात

कश्यप यांची मुलगी, यूट्यूबर आलिया कश्यपने नुकतेच शेन ग्रेगोइरेसोबत लग्न केले.

Entertainment news: अनुराग कश्यपच्या मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, तरुण अभिनेत्याने पुढे केला मदतीचा हात
मुंबई:

अनुराग कश्यप बऱ्याच काळापासून भारतीय सिनेमातील सर्वात धाडसी फिल्म निर्मात्यांपैकी एक मानले जातात. पण आता ते लोकप्रियतेच्या एका नव्या लाटेवर स्वार आहेत. तेही एका अभिनेता म्हणून, विशेषतः दक्षिण भारतीय चित्रपटाच त्यांनी आपली छाप उमटवली आहे. 'इमाइका नोडिगल' (2018) मध्ये एका खलनायकाची भूमिका साकारण्यापासून ते ब्लॉकबस्टर 'महाराजा'चित्रपटात त्यांनी आपली छाप सोडली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'द हिंदू' सोबतच्या संभाषणात कश्यप यांनी सांगितले की दक्षिण भारतीय सिनेमातील त्यांची एंट्री ही अचानक झाली होती. ही संधी दुसऱ्या तिसऱ्या कुणामुळे नाही तर विजय सेतुपती यांच्यामुळे शक्य झाल्याचं ही अनुराग यांनी सांगितलं. अनुराग कश्यप म्हणाले, "इमाइका नोडिगल नंतर मी दक्षिणेकडील अनेक चित्रपट नाकारले. दर दुसऱ्या दिवशी ऑफर्स येत होत्या. मग, 'केनेडी'च्या पोस्ट-प्रोडक्शन दरम्यान, मी माझ्या शेजाऱ्याच्या घरी विजय सेतुपतीला भेटत राहिलो."

ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: 110 दहशतवादी ठार, 9 दहशतवादी अड्डे , पाक एअर बेस, ऑपरेशन सिंदूर मध्ये काय काय घडलं?

ते पुढे म्हणाले, "सेतुपतीने मला सांगितले की ते माझ्यासाठी एक उत्कृष्ट स्क्रिप्ट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मी सुरुवातीला नकार दिला. पण त्यांनी 'केनेडी'मध्ये काहीतरी शोधण्यात मला मदत केली. त्याच वेळी आपण  पुढील वर्षी आपल्या मुलीचे लग्न कराणार आहे. त्यासाठी मी त्याचा खर्च उचलू शकेन असं वाटत नाही असं त्यांनी विजय सेतूपती याला सांगितलं. त्यावर विजय म्हणाला,'आम्ही तुम्हाला मदत करू.'आणि अशा प्रकारे 'महाराजा' बनल्याचं त्याने सांगितलं. शिवाय लग्नासाठी ही मदत केली.  

ट्रेंडिंग बातमी - India Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; भारतीय हवाई दलाचं सूचक ट्वीट

कश्यप यांची मुलगी, यूट्यूबर आलिया कश्यपने नुकतेच शेन ग्रेगोइरेसोबत लग्न केले. 'महाराजा'च्या यशानंतर कश्यप यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी वेत्रिमारन यांच्या आगामी 'विदुथलाई पार्ट 2', आशिक अबू यांच्या मल्याळम ॲक्शन कॉमेडी 'रायफल क्लब' आणि आदित्य दत्त यांच्या हिंदी वेब थ्रिलर 'बॅड कॉप' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ते अदिवी शेषसोबत त्यांच्या आगामी मोठ्या तेलगू चित्रपट 'डकैत: ए लव्ह स्टोरी' मध्येही दिसणार आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com