DDLJ ची 'चुटकी' आठवतेय? 30 वर्षानंतर झाली खूप सुंदर, फेमस अभिनेत्रीही फिक्या पडतील, एका क्लिकवर पाहा सर्व फोटो

Actress Pooja Ruparel Photo Viral : डीडीएलजे म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमातील 'चुटकी' नावाचं पात्र अनेकांना खूपच आवडलं होतं. आता हीच चुटकी म्हणजे अभिनेत्री पूजा रुपारेल खूपच सुंदर झाली आहे. पाहा तिचे व्हायरल फोटो.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pooja Ruparel Latest Photo
मुंबई:

Actress Pooja Ruparel Photo Viral : डीडीएलजे म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'सिनेमानं 1995 मध्ये बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील 'चुटकी' नावाचं पात्र अनेकांना खूपच आवडलं होतं. तिच चुटकी जिने राज आणि सिमरनचं लग्न जुळवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. म्हणजेच या कपल्सची लव्ह स्टोरी पुढे नेण्यात चुटकीनं खूप मदत केली होती. आज आम्ही तुम्हाला त्याच चुटकीबद्दल म्हणजे पारूल रुपारेलचे लेटेस्ट फोटो दाखवणार आहोत. सतीश शाह यांच्या निधनानंतर पारूलने त्यांच्यासोबत जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. यानिमित्ताने चुटकीने इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट शेअर केली आहे. चुटकी आता काय करते? ती कशी दिसते? याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूजा रुपारेल यांनी ते दिवस आठवले, जेव्हा तिने सतीश शाह यांच्यासोबत दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमात काम केलं होतं. पूजा रुपारेल डीडीएलजेमध्ये चुटकीची भूमिका साकारली होती. आयएएनएसशी बोलताना पूजाने म्हटलं की, सतीश शाह सेटवर आम्हाला नेहमीच हसवायचे. ते त्यांच्या मजेशीर अंदाजात शूटिंगचं वातावरणं खेळीमेळीचं करायचे. त्यांचे बोलणे इतके प्रभावी होते की, सेटवर असणारे लोक खूप हसायचे. आमच्यासाठी लंच ब्रेक एखाद्या कॉमेडी शोसारखा असायचा.

नक्की वाचा >> Asurvan Marathi Movie :वाघाचा मुखवटा, देवाचं सोंग..घनदाट जंगल अन् आदिवासी संस्कृती, 'असुरवन' मराठी चित्रपटाचं थरारक पोस्टर प्रदर्शित

पूजाने एक खास किस्सा शेअर करत म्हटलं, जेव्हा सतीश शाहने फिल्ममध्ये शाहरुख खानला म्हटलं की, तुम्ही जीनियस तर आहात..पण इंडिजिनियसही आहात. पुजाने आयएएनएसच्या मुलाखतीत पुढे म्हटलं की, सतीश शाह समजदार आणि आकर्षक होते. त्यांचं अभिनय खूप अप्रतिम होतं. सेटवर त्यांची उपस्थिती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरायची. त्यांचं निधन संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्याविषयी आमच्या मनात नेहमीच आदर असेल.

दरम्यान, सतीश शाह यांचं करिअर शानदार होतं. त्यांनी फिल्म आणि टीव्ही शोजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. जाने भी दो यारो, साराभाई वर्सेस साराभाई, मै हूं ना आणि ओम शांती ओम या सिनेमातही त्यांनी जबरदस्त अभिनयाची छाप टाकली. त्यांच्या कलेनं प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजीत केलं आणि प्रेरणा दिली.

Advertisement

नक्की वाचा >> ट्रेनमध्ये चढली बँकॉकची परदेशी महिला,गर्दीत आला सर्वात घाणेरडा अनुभव, थेट रेल्वेमंत्र्यांना Video टॅग केला अन्