जाहिरात

वाघाचा मुखवटा, देवाचं सोंग..घनदाट जंगल अन् आदिवासी संस्कृती, 'असुरवन' मराठी चित्रपटाचं थरारक पोस्टर प्रदर्शित

Asurvan Marathi Movie Poster launch :  दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत बहुप्रतिक्षित ‘असुरवन’या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे.

वाघाचा मुखवटा, देवाचं सोंग..घनदाट जंगल अन् आदिवासी संस्कृती, 'असुरवन' मराठी चित्रपटाचं थरारक पोस्टर प्रदर्शित
Asurvan Movie Poster Launch
मुंबई:

Asurvan Marathi Movie Poster launch :  दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत बहुप्रतिक्षित ‘असुरवन'या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरला तब्बल 1 मिलियन व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या पोस्टरची तुफान चर्चा रंगली आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा,अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सचिन आंबात लिखित व दिग्दर्शित ‘असुरवन'हा चित्रपट आदिवासी प्राचीन वारली परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे.पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी अनेकांचा गोंधळही उडवतोय.

दिग्दर्शक सचिन आंबात यांनी चित्रपटाच्या मोशन पोस्टरविषयी म्हटलंय की, “माझ्या पहिल्या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतचं सोशल मीडियाद्वारे प्रसारित केल आहे.सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.त्या मोशन पोस्टरमध्ये जंगल दिसत आहे,तर ते शापित जंगल आहे म्हणून ते 'असुरवन'नावाने प्रचलित आहे आणि त्या असुरवनात मध्यभागी मुखवटा धारण केलेलं पात्र दिसत आहे. त्या मुखवट्याला आदिवासी वारली भाषेत 'देवाचा सोंग'म्हंटल जातं.

इथे पाहा असुरवन चित्रपटाचा थरारक पोस्टर

नक्की वाचा >> KDMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा बडा नेता भाजपच्या गळाला?

सचिन आंबात यांनी पुढं म्हटलं आहे की, जो मुखवटा धारण केला आहे तो 'फिरसत्या'देवाचा आहे. हा फिरसत्या देव जंगलात हरवलेल्या चांगल्या मनाच्या लोकांना रस्ता दाखवतो आणि जे वाईट मनाने जंगलात सापडतील त्यांना चकवा लावून त्या जंगलात बंदिस्त करतो. तर हा 'फिरसत्या'रस्ता दाखवतो की चकवा लावतो हे तुम्हाला 'असुरवन'चित्रपटात पाहायला मिळेल.असुरवन हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नक्की वाचा >> नवी मुंबईत खळबळ! उलव्यात नेपाळी कुटुंबासोबत घडली सर्वात भयंकर घटना, एकाचा मृत्यू...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com