Aishwarya Rai Salman Khan split: बॉलीवूडमधील सर्वात गाजलेल्या आणि तितक्याच वादग्रस्त ठरलेल्या प्रेम कहाण्यांचा विषय निघाल्यास सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. या दोघांचे नाते संपून आता दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटला आहे.त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपनंतर नक्की काय घडले होते, याबाबतचे अनेक खुलासे आजही समोर येत असतात. प्रसिद्ध जाहिरात निर्माते प्रल्हाद कक्कर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायला कोणत्या अत्यंत कठीण प्रसंगांना आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते, याचा धक्कादायक खुलासा केला आहे. ब्रेकअपनंतर ऐश्वर्या इतकी हादरली होती की तिचा संपूर्ण सिनेसृष्टीवरून विश्वास उडाला होता, असे कक्कर यांनी सांगितले आहे.
कशी होती ऐश्वर्याची अवस्था?
विक्की लालवानी यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी त्या काळातील अनेक गोष्टींवरून पडदा उचलला. ते म्हणाले की, जेव्हा सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले, तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी सलमान खानच्या बाजूने उभी राहिली होती. या संपूर्ण वादात ऐश्वर्याचीच कशी चूक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न अनेकांकडून केला जात होता. कठीण काळात ऐश्वर्या पूर्णपणे एकटी पडली होती आणि तिला कुठेच आधार मिळत नव्हता.
( नक्की वाचा : Abhishek Bachchan : घटस्फोटाच्या चर्चांचा आराध्यावर काय परिणाम? अभिषेक बच्चननं पहिल्यांदाच मौन सोडलं )
नात्यातून बाहेर पडल्याचे तिला दुःख नव्हते, कारण सलमानचा स्वभाव अत्यंत रागीट होता आणि आपल्यासोबत धोका झाला आहे याची तिला जाणीव होती. मात्र, लोकांनी आणि इंडस्ट्रीने तिला दिलेल्या वागणुकीमुळे ती सिनेसृष्टीचा द्वेष करू लागली होती आणि प्रचंड घाबरली होती.
ऐश्वर्या राय आणि प्रल्हाद कक्कर हे एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी हा संपूर्ण काळ जवळून पाहिला होता. मुलाखतीत कक्कर यांनी सांगितले की, त्या कठीण प्रसंगात मी ऐश्वर्याच्या पाठीशी उभा राहिलो होतो आणि तिला कोणत्याही गोष्टीची काळजी न करण्याचा सल्ला दिला होता. ऐश्वर्याने कधी स्वतःहून तिच्या मनातील गोष्टी माझ्याशी शेअर केल्या नाहीत, पण तिच्या चेहऱ्यावर आणि वागण्यातून ती भीती स्पष्ट दिसायची.
( नक्की वाचा : अभिषेक-ऐश्वर्यामुळे चर्चेत आलेला Grey Divorce प्रकार काय आहे? तो का घेतला जातो? )
बिल्डिंगच्या लॉबीमध्ये व्हायचा जोरदार गोंधळ
या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी सलमान खानच्या त्या काळातील वर्तनावरही थेट भाष्य केले. त्यांनी सांगितले की, जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात वाद टोकाला पोहचले होते, तेव्हा सलमान खान त्यांच्या बिल्डिंगच्या लॉबीमध्ये येऊन प्रचंड गोंधळ घालायचा. तो इतका रागात असायचा की लॉबीमधील भिंतींवर जोरजोरात स्वतःचे डोकं आपटायचा आणि ओरडायचा. या सर्व प्रकारामुळे ऐश्वर्या राय मानसिकदृष्ट्या प्रचंड खचली होती आणि तिला स्वतःच्या सुरक्षिततेची आणि भविष्याची मोठी भीती वाटत होती, असा खुलासा कक्कर यांनी इतक्या वर्षांनंतर केला आहे.