Prajakta Gaikwad : 'बनवा-बनवीचा सचिन पिळगावकर दिसतेस'; लग्नानंतर प्राजक्ताचा लुक ट्रोल, चाहते नको नको ते बोलले

लग्नानंतर प्राजक्ताचा नवा लुक समोर आला आहे. मात्र तिच्या या नव्या लुकवर चाहत्यांचा रोष पाहायला मिळत आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Prajakta Gaikwad New Look : 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील 'महाराणी येसुबाई'च्या भूमिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड डिसेंबर २०२६ मध्ये लग्नबंधनात अडकली. प्राजक्ताने व्यावसायिका शंभुराज खुटवड याच्याशी लग्नगाठ बांधली. प्राजक्ता-शंभुराजचं लग्न ग्रँड पद्धतीने पार पडलं. लग्नानंतर प्राजक्ताने रिसेप्शनही मोठं दिलं होतं. लग्नातील प्रत्येक विधी तिने चाहत्यांसोबत शेअर केला होता. दरम्यान लग्नानंतर प्राजक्ताचा नवा लुक समोर आला आहे. मात्र तिच्या या नव्या लुकवर चाहत्यांचा रोष पाहायला मिळत आहे.  

प्राजक्ताचा नवा लुक चाहत्यांना आवडेना...

आज २५ फेब्रुवारी रोजी प्राजक्ताने काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहे. प्राजक्ताने हेअरकट केला आहे. यामध्ये बँग्स कपाळावर दिसत आहे. पोस्ट करताना तिने #newlook #newhairstyle #change #changeisgood असे हॅशटॅग्जही दिले आहेत. मात्र तिने केलेला हा नवा लुक अनेक चाहत्यांना आवडत नसल्याचं दिसत आहे. 

नक्की वाचा - VIDEO: 'रिसेप्शन आहे की सर्कस?' प्राजक्ता गायकवाडवर नेटकरी संतापले, 'ती' गोष्ट खटकली

'.... सचिन पिळगावकर दिसतेस', प्राजक्ता गायकवाड ट्रोल

प्राजक्ता गायकवाडच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट येत आहे. काहींना तिचा लुक आवडला आहे. मात्र कित्येकांना तिचा लुक आवडला नाही. एका चाहत्याने म्हटलं... अशी ही बनवा-बनवीमधील सचिन पिळगावकर दिसतेस. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटलं, पहिल्यादा मला वाटलं एका पुरुषाने बाईचे कपडे घातले आहेत.

तर दुसऱ्या एकाने म्हटलं, हा तर बॉलीवुडमधला बॉबी डार्लिंग. प्राजक्ता तू साध्या लूकमध्येच छान दिसते अशा अनेक कमेंट तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत. 

Advertisement