Prajakta Gaikwad Reception Entry VIDEO: मराठी सिनेविश्वात सध्या लग्नांचा धडाका सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच बिग बॉस 5चा विजेता सुरज चव्हाण विवाहबंधनात अडकला. सुरजच्या लग्नानंतर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही विवाह बंधनात अडकली आहे. प्राजक्ताने व्यावसायिक शंभुराज खुटवड याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर प्राजक्ताचे भव्य रिसेप्शन पार पडले. यावेळी शंभुराज आणि प्राजक्ताने केलेल्या ग्रँड एन्ट्रीवरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नंदीवरुन एन्ट्री
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज खुटवड यांचा विवाह सोहळा 2 डिसेंबर रोजी पार पडला. लग्नानंतर प्राजक्ताचे भव्य रिसेप्शनही पार पडले. या रिसेप्सनमध्ये प्राजक्ता गायकवाडने पतीसह एका भव्य नंदीवर स्वार होऊन एन्ट्री घेतली. तिच्या या ग्रँड एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिची ही जबरदस्त एन्ट्री पाहून नेटकरी थक्क झाले पण काहीजणांनी यावरुन जोरदार टीकाही केली आहे. नंदीवर बसून केलेल्या एन्ट्रीमुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्राजक्ता गायकवाडवर नेटकरी संतापले..
राजश्री मराठीने प्राजक्ताच्या लग्नातील हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री सुष्मा यांनी हे फार चुकीचे आहे, आपल्याच देवांची मस्करी आहे ही आणि असं स्वत:ला श्रेष्ठ ठरवलं, काय बोलायचं? असा सवाल करत नाराजी व्यक्त केली आहे. तर आणखी एकाने रिसेप्शन आहे की सर्कस? असा सवाल केला आहे. प्राजक्ताताई आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती आपण लग्नासाठी काहीतरी वेगळी थीम करायला पाहिजे होती, असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला या एन्ट्रीवरुन जोरदार ट्रोल केले आहे.
दरम्यान, रिसेप्शनला प्राजक्ताने केलेला पारंपारिक लूक खुपच सुंदर दिसत होता. रिसेप्शनसाठी प्राजक्ताने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती. तर पती शंभुराज खुटवाडने लाल रंगाच्या साडीला शोभेल अशी शेरवानी परिधान केली होती. त्यांच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी दोघांनाही नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
( नक्की वाचा : Dharmendra : 'यमला पगला दिवाना' माझा चित्रपट होता, धर्मेंद्र यांचा फोन आला आणि...सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world