प्राजक्ता माळीचा फुलवंती या तारखेला होणार रिलीज, बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

Phullwanti Marathi Movie : तुमच्या मनावर राज्य करण्यासाठी लवकरच भेटीला येतेय फुलवंती...

जाहिरात
Read Time: 2 mins

Phullwanti Marathi Movie : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'फुलवंती' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. निर्माती प्राजक्ता माळीने आपल्या वाढदिवशी एक लक्षवेधी मोशन पोस्टर (Phullwanti Motion Poster) शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या 11 ऑक्टोबर 2024 रोजी 'फुलवंती' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल प्रविण तरडे (Snehal Tarde) दिग्दर्शित या सिनेमामध्ये प्राजक्ता माळी (Prajkta Mali)'फुलवंती'च्या (Phullwanti) भूमिकेत झळकणार आहे. 

अभिनेत्रीचे दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण 

फुलवंती सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री स्नेहल तरडे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 

(नक्की वाचा: मुलीच्या अचानक मृत्यूमुळे अभिनेत्री हादरली, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट)

आकर्षक मोशन पोस्टर

रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये सजलेल्या राजेशाही पालखीमध्ये भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान करून 'फुलवंती' दिमाखात बसलेली दिसत आहे. या सौंदर्यवतीच्या मनमोहक रूप पाहून कोणीही घायाळ होईल. मोशन पोस्टरमधील पार्श्वसंगीतावरून हा संगीतमय चित्रपट असल्याचे दिसतेय. पहिली झलक पाहताच 'फुलवंती' सिनेमाची भव्यता कळते. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरू शकते.         

(नक्की वाचा: नेस वाडिया - प्रीती झिंटा यांच्या नात्याचं सत्य काय? लव्हस्टोरी ते हेट स्टोरी कसा झाला प्रवास?)


पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबरीवर आधारित सिनेमा

'फुलवंती'बाबत प्राजक्ता माळी म्हटले की,'मी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना ही आनंदाची बातमी देऊ शकले; याबद्दल देवाचे आभार.  'फुलवंती' माझ्यासाठी खूप खास आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मी निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केला आणि मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकांनी मला विचारले की 'फुलवंती'चं का ? फुलवंतीच्या कथानकाच्या मी प्रेमात पडले; साहित्य क्षेत्रातील काही दु्र्मिळ हिऱ्यांपैकी 'फुलवंती' एक आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या 'फुलवंती' कादंबरीवर चित्रपट व्हावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. मागील तीन वर्षांपासून अत्यंत अभ्यास करून-मेहनत घेऊन आम्ही 'फुलवंती' तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज  आहे. हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरची सर्वात भव्य कलाकृती ठरेल, याची मला खात्री आहे.'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलं नांदेडच्या गुरुद्वारेचं दर्शन

Topics mentioned in this article