Prajakta-Shambhuraj रिसेप्शन एण्ट्रीमुळे ट्रोल; वास्तू-ज्योतिष शास्त्रज्ञांनी दिला धर्मशास्त्राचा दाखला, Video

लग्नानंतर प्राजक्ताचे भव्य रिसेप्शन पार पडले. यावेळी शंभुराज आणि प्राजक्ताने केलेल्या ग्रँड एन्ट्रीवरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Prajakta Shambhuraj wedding troll : सिनेविश्वात सध्या लग्नसोहळे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सूरज चव्हाणचा लग्नसोहळा पार पडला. त्याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने व्यावसायिक शंभुराज खुटवड याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ग्रँड एण्ट्रीमुळे प्राजक्ता ट्रोल...

लग्नानंतर प्राजक्ताचे भव्य रिसेप्शन पार पडले. यावेळी शंभुराज आणि प्राजक्ताने केलेल्या ग्रँड एन्ट्रीवरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्राजक्ता आणि शंभुराज यांचा २ डिसेंबर रोजी विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर रिसेप्शनमध्ये प्राजक्ताने पती शंभुराजसोबत भव्य नंदीवर बसून एन्ट्री घेतली. तिची जबरदस्त एन्ट्री पाहून नेटकरी थक्क झाले. परंतू अनेकांनी यावर जोरदार टीका केली. राजश्री मराठीने प्राजक्ताच्या लग्नातील हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्राजक्ताच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी प्राजक्ताच्या एन्ट्रीवर राग व्यक्त केला.

ही आपल्याच देवांची मस्करी आहे. देवांना कमी लेखत स्वत:ला श्रेष्ठ ठरवलं जातंय, काय बोलायचं? असा सवाल करत नाराजी व्यक्त केली आहे. तर आणखी एकाने रिसेप्शन आहे की सर्कस? असा सवाल केला आहे. प्राजक्ताताई आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती आपण लग्नासाठी काहीतरी वेगळी थीम करायला पाहिजे होती, असं म्हणत नेटकऱ्यांनी प्राजक्ताला या एन्ट्रीवरुन जोरदार ट्रोल केले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Samantha Raj Marriage : समांथा अन् राज निदिमोरूने केला 'भूत शुद्धी विवाह', काय आहे ही परंपरा?

ती एण्ट्री धर्मशास्त्रालाअनुसरूनच...

प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराजेच्या लग्नातील एन्ट्रीवरून टीका चाहत्यांकडून टीका केल्यानंतर वास्तूतज्ञ आनंद पिंपळीकर यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे. पहिलं म्हणजे त्यांनी प्राजक्तावरील आरोपाचं खंडन केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यांनतर एक सोहळा आयोजित करण्यात आला ज्यात नंदीवर बसून मंचावर त्यांची एण्ट्री होते. यावरून दोघेही सोशल मीडियावर ट्रोल झाले. पण त्यांनी जे केलं ते चुकीचं नाही असं मत आनंद पिंपळीकर यांनी व्यक्त केलं आहे. ज्यावेळेस लग्न मंडपात नवरदेव नवरीची एन्ट्री होते तेव्हा त्यांना विष्णू आणि लक्ष्मीचं रूप मानलं जातं. धर्मशास्त्रातही त्यांना नर नारी नसून विष्णू लक्ष्मीचं रूप मानलं जातं. विष्णू आणि लक्ष्मीच्या लग्नात लग्नात शंकर भगवानाने गणासह सहभाग दर्शवला असल्याचे विविध पुराणात म्हटलं आहे. वरातीत शंकर भगवान आणि त्यांच्या गणांना, वाद्यांना एक महत्व दिलं जातं. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या एन्ट्रीवर टीका करणं चुकीचं आहे असं स्पष्ट मत आनंद पिंपळीकर यांनी दिलं आहे.