samantha ruth prabhu raj nidimoru wedding : दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी १ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. दाम्पत्याने कोयंबतूर स्थित इशा योग केंद्रात लिंग भैरवी मंदिरात लग्न केलं. समांथा आणि राज यांनी भूत शुद्धी विवाह केला. जाणून घेऊया काय आहे भूत शुद्धी विवाह...
भूत शुद्धी विवाह काय आहे? (What is bhuta shuddhi vivaha)
इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, हा एक प्राचीन यौगिक विधी आहे. या विधीत नवरा-नवरीचं शरीर, मन आणि ऊर्जा पाच तत्व पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांनी पूर्णपणे शुद्ध केलं जातं. भूत शुद्धी विवाहात पती-पत्नीदरम्यान खोल अध्यात्मिक आणि ऊर्जेचं नातं तयार होतं. असं मानलं जातं की या अनुष्ठानातून वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि अध्यात्मिक एकता निर्माण होते.
नक्की वाचा - Samantha Marriage : समांथानेच नागा चैतन्यला धोका दिला? राजसोबत सिक्रेट लग्नानंतर अभिनेत्रीवर चाहते संतापले!
लग्न कसं होतं?
या लग्नात लिंग भैरवी देवीची पूजा केली जातं. दाम्पत्य पवित्र अग्निच्या चारही बाजुंनी परिक्रमा करतात. मंदिरात देवीच्या समोर एकमेकांना आजीवन साथ देण्याची शपथ घेतली जाते. लग्नाचा हा सोहळा अत्यंत शांत, साधेपणाने आणि खासगीपद्धतीने केला जातो. या लग्नात निकटवर्तीय आणि मित्रांचा समावेश असतो.
इशा केंद्राशी काय आहे संबंध?
भूत शुद्धी विवाह हा इशा केंद्रात होतो. इशा केंद्रात तीन प्रकारचे विवाह होतात. भूत शुद्धी विवाह, लिंग भैरवी विवाह आणि विवाह वैभव. यामध्ये भूत शुद्धी विवाहाला सर्वात शुद्ध आणि शक्तिशाली मानलं जातं. मात्र नवरी गर्भवती असेल तर हा विशेष अनुष्ठान होऊ शकत नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
