अभिनेत्री प्रिती झिंटा आणि केरळ काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे. केरळ काँग्रेसने केलेल्या ट्वीटमुळे प्रिती झिंटा दुखावली गेली आणि तिने काँग्रेसच्या आरोपांना थेट सोशल मीडियावर उत्तर दिलं आहे. अभिनेत्री प्रिती झिंटाने तिचे सोशल मीडिया अकाउंट एका राजकीय पक्षाला (भाजप) दिले आहेत, असा दावा काँग्रेस केरळने केला होता. यावर प्रितीने ट्वीट करून याला 'फेक न्यूज' म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रिती झिंटाचं सनसनीत उत्तर
प्रिती झिंटाने ट्विट करत म्हटलं की, "मी माझे सोशल मीडिया अकाउंट स्वतः चालवते आणि खोट्या बातम्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कोणीही माझ्यासाठी काहीही लिहिले नाही किंवा कर्ज घेतले नाही. कोणताही राजकीय पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते माझ्या नावाचा आणि फोटोंचा वापर करून खोट्या बातम्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि घाणेरड्या गॉसिप आणि क्लिक बेटमध्ये गुंतले आहेत, हे पाहून मला धक्का बसला. जे कर्ज घेतले गेले होते ते 10 वर्षांपूर्वीच फेडले होते. आशा आहे की हे स्पष्ट होईल आणि भविष्यात कोणतेही गैरसमज होणार नाहीत."
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
काँग्रेसने काय ट्वीट केलं होतं?
एक्स अकाऊंटवर प्रिती झिंटाचा फोटो शेअर करताना केरळ काँग्रेसने लिहिले होते, "प्रिती झिंटाने भाजपला सोशल मीडिया खातं दिलं आणि 18 कोटी रुपये माफ केले. गेल्या आठवड्यात बँक दिवाळखोर झाली. ठेवीदार त्यांच्या पैशासाठी रस्त्यावर आहेत."
(नक्की वाचा- प्रिती झिंटाचं 18 कोटींचं कर्ज खरंच माफ झालं होतं? न्यू इंडिया बँकेतला 'झोल' नेमका काय?)
काय आहे आरोप?
न्यू इंडिया बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत 2020 मध्ये रिझर्व्ह बँकेला त्या बँकेत सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल सहीनिशी पत्रव्यवहार केला होता. अभिनेत्री प्रिती झिंटाला बँकेने 18 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. प्रिती झिंटा हिने ते कर्ज फेडले नाही, त्यामुळे थकबाकी वाढली होती. बँकेने हे कर्ज वसूल करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. बँकेच्या नियमांचं कोणतेही पालन न करता ते कर्ज राइट ऑफ केले आणि ते बँकेच्या तोट्यात वर्ग केले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रिती झिंटाने हे कर्ज कॅरेबियन देशांत टी-20 क्रिकेट स्पर्धेतील संघासाठी बोली लावण्यासाठी घेतले होते.