अक्षय कुमारही घाबरायचा, शाहरुखच्या करिअरलाही होता धोका, 'तो' अभिनेता 'या' एका चुकीमुळे बनला 'बी ग्रेड'हिरो

एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत,ज्याने बॉलिवूडमध्ये शानदार सुरुवात केली. या अभिनेत्याला ‘पुढचा राजेश खन्ना’असंही म्हटलं जात होतं. पण पुढे असं काही घडलं..

जाहिरात
Read Time: 2 mins
Bollywood Viral News
मुंबई:

Bollywood Viral News :  बॉलिवूडमध्ये अभिनयाची जबरदस्त छाप टाकणाऱ्यांमध्ये राजेश खन्ना,अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या अभिनेत्यांची नावे अग्रस्थानी आहेत. पण सध्याच्या घडीला सलमान खान, अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांचा बोलबाला आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत,ज्याने बॉलिवूडमध्ये शानदार सुरुवात केली. या अभिनेत्याला ‘पुढचा राजेश खन्ना'असंही म्हटलं जात होतं. पण एका करारामुळे या अभिनेत्याच्या करिअरला ब्रेक लागला.जर त्याने हा करार साइन केला नसता, तर शाहरुख खानची ‘दीवाना' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली नसती.पण हा अभिनेता आहे तरी कोण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

कोण आहे तो अभिनेता?

ज्या अभिनेत्याबाबत सांगत आहोत,त्याचं नाव आहे पृथ्वी वजीर. त्याने 1992 मध्ये अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ‘दिल का क्या कसूर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. त्यानंतर पृथ्वी वजीर चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनला.तसच त्याला ‘पुढचा राजेश खन्ना' असा टॅगही माध्यमांनी दिला होता. या चित्रपटाच्या यशानंतर पृथ्वी वजीर एका रात्रीत स्टार बनला. तसच पृथ्वीला अनेक चित्रपटांच्या ऑफरही येऊ लागल्या.

नक्की वाचा >> Viral Video : स्मृती मंधाना-पलाश मुच्छलच्या हळदीचा व्हिडीओ समोर, 'वर्ल्डकप विनर' नवरी मांडवात तुफान नाचली!

रोमँटिक हिरो बनला पृथ्वी वजीर

रोमॅन्टिक हिरोबद्दल बोलायचं झालं तर, अनेकांच्या मनात शाहरुख खानचं नाव येतं.पण एक काळ असा होता की रोमँटिक हिरोच्या भूमिकेसाठी फक्त पृथ्वी वजीर यांनाच निवडले जात असे.त्या वेळी असे म्हटले जात होते की, एखाद्या चित्रपटात रोमॅन्टिक हिरोची जागा फक्त पृथ्वीच भरू शकतो.त्या काळात पृथ्वीचा असा दबदबा होता की अक्षय,अजय,गोविंदा यांसारख्या मोठ्या हिरोंनाही त्याची भीती वाटायची. 

नक्की वाचा >> मुलींना कोणत्या टाईपचा मुलगा आवडतो? दाढीवाला, रोमॅन्टिक की बॉडी बिल्डर? हॉस्टेलच्या पोरींचा 'तो' Video व्हायरल

त्या करारामुळे सर्वकाही उद्ध्वस्त झालं

पृथ्वीने त्याच्या करिअरच्या सुरुवातीला जो करार साइन केला होता,त्याच करारामुळे त्याची मोठी अडचण झाली होती.त्याने ज्या करारावर सही केली होती,त्यात लिहिलं होतं की,तो इतर कोणत्याही प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटात काम करू शकत नाहीत.याच कारणामुळे त्याने ‘डर'आणि ‘दीवाना'यांसारखे चित्रपट गमवावे लागले.‘दीवाना' या चित्रपटातूनच शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.जर पृथ्वीने तो करार साइन केला नसता आणि तर आज कहाणी काहीतरी वेगळी असती. 

Advertisement