जाहिरात

एका रात्रीचे 20 लाख, बॉलिवूड अभिनेत्रीची 'वन नाइट स्टँड'मधून मोठी कमाई; डिटेक्टिव्हच्या दाव्याने खळबळ

तान्याने त्या अभिनेत्रीबद्दल सांगितलं, ती पैशांच्या बदल्यात शरीर सुख देत होती. या अभिनेत्रीचं सत्य जेव्हा तिच्या पार्टनरला कळालं त्यानंतर तो तिच्यापासून दूर गेला नाही.

एका रात्रीचे 20 लाख, बॉलिवूड अभिनेत्रीची 'वन नाइट स्टँड'मधून मोठी कमाई; डिटेक्टिव्हच्या दाव्याने खळबळ
कोण आहे ही अभिनेत्री, तान्या पुरीने दिले संकेत...

Private Detective Tanya Puri shocking allegation on bollywood actress : प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी हिने अनेक धक्कादायक दावे केले आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री वन नाइट स्टँडमधून (Famous Actress One Night Stand) पैसे कमावते. ही अभिनेत्री विविध देशांमध्ये उद्घाटनासाठी जाते आणि हॉटेलमध्ये लोकांची भेट घेते. डिटेक्टिव्ह तान्या पुरीने दावा केला आहे की, अभिनेत्री तास आणि रात्रीनुसार ग्राहकांकडून पैसे आकारत होती. धक्कादायक बाब म्हणजे तिच्या पार्टनरला तिच्या या कृत्याची माहिती होती. 

सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत तान्या पुरी हिने बॉलिवुडमधील काळं सत्य (black truth in bollywood) लोकांसमोर आणलं. ती म्हणाली, काही काळापासून एक अभिनेत्री बॉलिवुडमध्ये काम करते. मध्यंतरीच्या काळात ती फार सक्रिय नव्हती. मात्र बॉलिवुडमध्ये तिची खूप चांगली प्रतिमा आहे. ती एकासोबत रिलेशनशीपमध्येही आहे. मात्र हे केवळ लोकांना दाखविण्यासाठी. दाराच्या आडून ती हॉटेलमध्ये लोकांना भेटते. प्रत्यक्षात ती एस्कॉर्टचं काम करते. 

अनेकांशी संबंध...

तान्या पुरीने या अभिनेत्रीबद्दल सांगितलं, ती लोकांना भेटते. एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी ती लोकांकडून पैसे घेते. मात्र पडद्याच्या मागे काहीतरी वेगळचं सुरू आहे. या अभिनेत्रीचा पार्टनर आमच्याकडे आला होता. त्याला अभिनेत्रीवर संशय होता. यानंतर आम्ही त्या अभिनेत्रीवर नजर ठेवायला सुरुवात केली. यावेळी लक्षात आलं की, अभिनेत्रीचे केवळ एका तरुणासोबत संबंध नव्हते. तर अनेकांशी ती जोडली गेली होती. अनेक देशांमध्ये ती विशेष उपस्थिती लावत होती. ती जाते आणि लोकांना भेटले. त्यासाठी पैसेही चार्ज करते. 

नक्की वाचा - Ajay Devgn: अजय देवगण दिवसातून किती वेळा दारू घेतो? ब्रँड,वेळ, अन् किंमतही सांगितली

पैशांच्या बदल्यात शरीरसुख...

तान्याने त्या अभिनेत्रीबद्दल सांगितलं की, ती पैशांच्या बदल्यात शरीर सुख देत होती. या अभिनेत्रीचं सत्य जेव्हा तिच्या पार्टनरला कळालं त्यानंतर तो तिच्यापासून दूर गेला नाही. अशा परिस्थितीत आमच्याकडे आलेले ९० टक्के लोक नातं तोडत नाही. कारण ते पैसे त्यांना उपयुक्त ठरतात. बिझनेसमध्ये या पैशांची मदतच होते.  ते दोघेजण एकत्रितपणे एक बिझनेस करीत होते. त्यासाठी अभिनेत्रीकडून आलेले पैसे फायदेशीर ठरत होते. 

एका महिन्यात १० जणांना भेटायची...

तान्याने पुढे सांगितलं, अभिनेत्री एका महिन्यात दहा जणांना भेटायची. वन नाइट स्टँडसाठीची रक्कम खूप मोठी होती. एका रात्रीसाठी १० लाख, तर कधी ५ लाख तर काहीजणांकडून तिने २० लाख रुपयेही आकारले आहेत. ग्राहकांना काय हवंय यावर ही रक्कम अवलंबून असते. तान्या पुरी यांनी अभिनेत्रीबद्दल पुढे एक संकेत दिला आणि म्हणाली - ती एक प्रसिद्ध चेहरा आहे जी सेलिब्रिटी एंडोर्समेंट, रिबन कटिंग आणि अपिअरन्स करते.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com