शंतनूच्या नव्या मालिकेचा एपिसोड प्रियाने पाहिला, अन् सकाळी... सुबोध भावेने सांगितलं त्या रात्री नेमकं काय घडलं

Priya Marathe Shantanu Moghe Love Story: अभिनेता सुबोध भावेने प्रिया मराठे आणि शंतनू यांच्यामध्ये विलक्षण प्रेम होते, असे सांगितले.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Priya Marathe Shantanu Moghe Love Story: त्या दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं: सुबोध भावे"

Priya Marathe News: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वामध्ये शोकाकळा पसरलीय. 31 ऑगस्ट 2025 रोजी वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचे कॅन्सर आजारामुळे निधन झाले. प्रियाने कित्येक मालिका तसेच सिनेमांमध्ये दमदार भूमिका पार पाडून प्रेक्षकांच्या मनामध्ये हक्काचे स्थान निर्माण केले होते. प्रियाच्या अचानक झालेल्या निधनामुळे तिच्या नातेवाईकांसह चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यादरम्यान अभिनेता आणि तिचा चुलत भाऊ सुबोध भावे याने लोकमत फिल्मी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रियाच्या आठवणींना उजाळा दिलाय. यावेळेस त्याने प्रिया मराठे आणि शंतनू मोघेच्या नात्याबाबतही मोठी गोष्ट सांगितली. 

शंतनूने खूप केले...: सुबोध भावे

शंतनू मोघे आणि प्रिया मराठेच्या नात्याबाबत सांगताना सुबोध भावे म्हणाला की, "शंतनूसारखा (Shantanu Moghe) उत्तम माणूस तिच्या आयुष्यात नवरा म्हणून आला. त्या दोघांचा 13-14 वर्षांचा (Shantanu Moghe And Priya Marathe Love Story) एकत्र प्रवास आहे. त्या दोघांचे एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं. कोणीही करत नाही इतके त्या पोराने केले. आताच्या काळात आपण दोन ते तीन महिन्यात लोकांचे घटस्फोट झाल्याचे ऐकतो. अशा काळात या आजारपणामध्ये शंतनू ज्या ठामपणे प्रियासोबत उभा राहिला, स्वतःचं काम सोडून त्याने संपूर्ण वेळ प्रियाला दिला. शंतनूने जे नवीन काम हाती घेतले होते, त्याचा पहिला एपिसोड प्रिया जाण्याच्या आदल्या दिवशी (30 ऑगस्ट 2025) टेलिकास्ट झाला होता. मला असे वाटते तो एपिसोड प्रियाने पाहिला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आई- शंतनूसमोरच अखेरचा श्वास (Priya Marathe Deathe News) घेतला. दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम केले. मला खात्री आहे की ते पुन्हा कोणत्यातरी स्वरुपात एकमेकांसमोर (Priya Marathe Shantanu Moghe Love Story) येतील, तेव्हाही ते एकमेकांचेच असतील, इतकं त्यांचे नाते सुंदर होते". 

(नक्की वाचा: Priya Marathe News: 'प्रियाला पुन्हा कुठेतरी पाहेन असं वाटत होतं, कॅन्सरने तिचा घास घेतला' बहिणीविषयी बोलताना सुबोध भावे भावुक)

Advertisement

शंतनू मोघे आणि प्रिया मराठेची लव्ह स्टोरी | Priya Marathe Shantanu Moghe Love Story

शंतनू मोघे (Shantanu Moghe News) आणि प्रिया मराठे (Priya Marathe News) यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. मनोरंजन विश्वामध्ये त्यांचा आपापला स्ट्रगल सुरू असतानाच एका मैत्रिणीच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली. प्रिया मराठे मूळची ठाण्यातील रहिवासी होती, कामानिमित्त शर्वरी लोहकरे या मैत्रिणीसोबत ती अंधेरीला राहत असे. शंतनूचीही शर्वरीसोबत मैत्री होती. तिनेच प्रिया आणि शंतनूची भेट घडवून दिली. एका पार्टीमध्ये दोघं भेटले. या भेटीनंतर प्रिया आणि शंतनू यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आणि या नात्याचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. जवळपास दीड वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

Advertisement

(नक्की वाचा: Priya Marathe News: 'अचानक आलेली तब्येतीची अडचण... तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते' प्रिया मराठेने या व्हिडीओतून प्रकृतीची दिली होती माहिती)

लग्न करण्यापूर्वी शंतनूने प्रियाला फिल्मी स्टाइलमध्ये प्रपोज केले आणि दोघांनी थाटामाटात लग्न केले.