
Priya Marathe News: अभिनेत्री प्रिया मराठेचे (Priya Marathe Passes Away) कॅन्सरच्या आजाराशी झुंज देताना निधन झाले आहे. प्रियाने रविवारी (31 ऑगस्ट 2025) या जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. वयाच्या 38व्या वर्षी प्रियाने अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून प्रियावर कॅन्सर आजाराशी संबंधित औषधोपचार सुरू होते. स्टार प्रवाह चॅनेलवरील "तुझेच मी गीत गात आहे" (Tuzech Me Geet Gaat Aahe) ही प्रियाची शेवटची मालिका ठरली. प्रकृतीच्या कारणास्तव याच मालिकेतून तिने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या मालिकेमध्ये ती मोनिका कामत ही महत्त्वाची भूमिका साकारत होती. दोन वर्षांपूर्वी प्रियाने ((Priya Marathe Death News) सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मालिका सोडण्याच्या निर्णयाची माहिती प्रेक्षकांना दिली होती. याच व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या तब्येतीचीही माहिती दिली होती. प्रियाने 3 जुलै 2023 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत "तुझेच मी गीत गात आहे" (Tuzech Me Geet Gaat Aahe) मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. अचानक आलेली तब्येतीची अडचण हे मालिका सोडण्यामागील कारण तिने सांगितले होते. थरथरत्या आणि भावुक स्वरात प्रियाने ही माहिती दिली. पण त्यावेळेस प्रिया कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करतेय, याबाबत फारशी कोणालाच माहिती नव्हती. रविवारी सकाळी तिच्या निधनाच्या वृत्तावर चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही विश्वास बसत नव्हता. जवळपास दोन वर्षे प्रिया आजाराविरोधात लढा होती. व्हिडीओद्वारे प्रियाने तब्येतीबाबत नेमके काय सांगितले होते? जाणून घेऊया...
(नक्की वाचा: Priya Marathe News: पार्टीत भेट, मैत्री अन् फिल्मी प्रपोज.. अशी आहे प्रिया मराठे- शंतनू मोघेची LOVE STORY)
प्रिया मराठेने "तुझेच मी गीत गात आहे" मालिका सोडताना दिली होती तब्येतीची माहिती
"नमस्कार मी प्रिया मराठे,
प्रेक्षकहो तुम्ही मला तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Me Geet Gaat Aahe) या तुमच्या आवडत्या मालिकेत मोनिका कामत (Monika Kamat) ही भूमिका साकारताना पाहत होतात. होतात अशासाठी म्हणतेय कारण की यापुढे मी ती भूमिका साकारणार नाहीय. अचानक आलेली तब्येतीची अडचण यामुळे मला ही भूमिका सोडावी लागतेय. मोनिका कामत (Monika Kamat) हे कॅरेक्टर करताना मला खरंच खूप मजा येत होती. हे कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडत होतं. तुम्ही याच्यावर प्रचंड प्रेमही केलं. पण जो वेळ मी त्यांना देऊ शकत होते, तो वेळ अपुरा पडत होता. बाकी कलाकारांच्या अॅडजस्टमेंट्स म्हणा प्रोडक्शन टीम, क्रीएटिव्ह टीम, तो रोल इतका डिमांडिंग होता की या सगळ्याच कारणांमुळे मला या मालिकेतून निरोप घ्यावा लागतोय. पण तुम्ही ही मालिका पाहणं सोडू नका. कारण माझी भूमिका आता अतिशय उत्तम आणि छान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी ही करणार आहे आणि I am very sure ती ही भूमिका खूप छान प्रकारे करेल आणि तुम्हाला सगळ्यांना ती नक्की आवडेल. सो तुम्ही ही मालिका पाहतच राहा आणि मी माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे आणि लवकरच परत येणार आहे. तुम्हाला भेटायला एका नव्या भूमिकेत... एका नव्या मालिकेत... स्टार प्रवाह या तुमच्या आवडत्या वाहिनीवर... तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते आणि लवकरच भेटते. मला आतापर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद".
(नक्की वाचा: Priya Marathe: 'हेवा वाटावा असा सुखी संसार तुटला', प्रियाच्या अकाली एक्झिटने दिग्गज कलाकार हळहळले!)
Priya Marathi Video: प्रिया मराठेने नेमके काय म्हटलं होते? ऐका...
"लवकर बरी हो", प्रेक्षकांनी व्यक्ती केली होती काळजी
प्रियाने अचानक मालिका सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे चाहते निराश झाले होते. चाहत्यांनी प्रियाला शुभेच्छा देत लवकर बरे हो असे म्हणत तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थनाही केली होती. पण अखेर कॅन्सरविरोधातील प्रियाची झुंज अयशस्वी ठरली.
(नक्की वाचा: 'बहीण लढवय्या होती..', प्रिया मराठेच्या निधनाने सिनेविश्व सुन्न! सुबोध भावे, अमोल कोल्हेंची भावुक पोस्ट)
प्रिया मराठेचा 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील प्रवास
'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Me Geet Gaat Aahe) ही मालिका 2 मे 2022 रोजी स्टार प्रवाह चॅनेलवर सुरू झाली होती. संगीत क्षेत्र आणि नात्यातील भावनिक गुंतागुत या विषयाभोवती मालिकेचे कथानक पाहायला मिळाले. अभिनेत्री प्रिया मराठेने या मालिकेमध्ये मोनिका कामत अशी खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारली होती. मालिकेमध्ये काम करत असताना प्रियाने सेटवरील गंमतीशीर, भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world