Priya Marathe Passes Away : 38 व्या वर्षी निधन; मालिका-नाटकातील प्रियाच्या 'या' भूमिका कधीच विसरू शकणार नाही

Who is Priya Marathe : प्रिया मराठेने अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. खूप कमी काळात तिने चाहत्यांच्या मनात आपल्या अभिनयाने घर केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रिया मराठे ही ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून

Marathi Actress Priya Marathe Death : मराठी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कर्करोगाच्या उपचारादरम्यान निधन झालं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना अगदी तिच्या निकटवर्तीयांनाही यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. अत्यंत मनमिळावू, मेहनती, उत्तर अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी आयुष्यातून घेतलेल्या एग्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Priya Marathe Cancer)

प्रिया मराठेने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून चाहत्यांच्या मनात घर तयार केलं होतं. याशिवाय प्रिया मराठे हिने अनेक जाहिरातीतही काम केलं होतं.  


 

प्रिया मराठे हिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत 'गोदावरी' तर 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत 'रायबाघन' या भूमिका साकारल्या होत्या. 

मराठी मालिका

तू भेटशी नव्याने - प्रोफेसर रागिणी
चार दिवस सासुचे - सोना अशोक देशमुख
तू तिथे मी - ज्योती मोहिते
या सुखांनो या - पावनी अधिकारी
स्वराज्य रक्षक संभाजी - गोदावरी
स्वराज्य जननी जिजामाता
येऊ कशी तशी मी नांदायला - मैथिली
तुझेच मी गीत गात आहे - मोनिका
आता होऊ दे धिंगाणा - Contestant

हिंदीबद्दल सांगायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रिया घराघरात पोहोचली. अगदी मराठी प्रेक्षकांसह हिंदी प्रेक्षकांचीही ती चाहती झाली. या मालिकेत अंकिता लोखंडे हिने अंकिताची मुख्य (priya marathe pavitra rishta) भूमिका साकारली होती. प्रिया मराठे हिने अंकिता लोखंडेच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं मोठं कौतुक करण्यात आलं होतं. 

Advertisement

हिंदी मालिका

पवित्र रिश्ता - अर्चनाच्या लहान बहिणीची भूमिका - वर्षा सतीश देशपांडे
कसम से - विद्या बाली
कॉमेडी सर्कस के सुपर स्टार - Contestant 
बडे अच्छे लगते है - ज्योती मल्होत्रा
साथ निभाना साथिया - भावनी राठोड
उतरन - रुबी
भारत के वीर पूत्र - महाराणा प्रताप - राणी सौभाग्यवती
जयोत्सुते - प्रगती राजवाडे
सावधान इंडिया - सपना
भागे रे मन - स्नेहा अवस्थी
कौन है - काव्या
 

Advertisement

नक्की वाचा - Priya Marathe Passes Away :  प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, मराठी अभिनय क्षेत्राला मोठा धक्का! 

नाटक 

कोण म्हणतं टक्का दिला? 
अ परफेक्ट मर्डर
तिला काही सांगायचंय

चित्रपट

हमने जिना सिख लिया
ती आणि इतर

4 वर्षांपूर्वी सासरे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंचं निधन

प्रिया मराठे हिने 2012 मध्ये अभिनेता शंतनु मोघे याच्यासोबत लग्न केलं होतं. शंतनु मोघे हा मराठीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा पूत्र. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची मराठी चित्रपट क्षेत्रावर मोठी छाप आहे. चार वर्षांपूर्वी 2021 मध्ये श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळात निधन झालं.