
Marathi Actress Priya Marathe death : मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्ष तिने शेवटचा श्वास घेतला. तिच्या एग्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया मराठे हिच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. त्यादरम्यान तिचं निधन झाल्याची माहिती आहे. (Shantanu Moghe wife Priya Marathe) मीरारोडमध्ये राहत्या घरात तिने शेवटचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी एक तरुण अभिनेत्रीने घेतलेल्या एग्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
चार दिवस सासुचे, पवित्र रिश्ता, तू तिथे मी, स्वराज्यरक्षक संभाजी, या सुखांनो या, या मालिकांमध्ये प्रिया मराठेने भूमिका साकारली होती. मालिका क्षेत्रातून प्रियाने मोठं नाव कमावलं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिने घेतलेल्या एग्झिटमुळे मराठी अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठे ही कर्करोगाशी झुंज (Priya Marathe Cancer) देत असल्याची माहिती अभिनय क्षेत्रातील फारशा कुणाला माहीत नव्हतं, असं समोर आलं आहे. मात्र बऱ्याच महिन्यांपासून ती कर्करोगावर उपचार घेत असल्याचं सांगितलं जात आहे.
कोण आहे प्रिया मराठे? (Who is Priya Marathe)
प्रिया मराठे हिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अनेक हिंदी मालिकांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत. हिंदीतील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्ता यातील कामामुळे ती घराघरांमध्ये पोहोचली होती. 2012 मध्ये तिने शंतनु मोघे या अभिनेत्यासोबत लग्न केलं होतं. प्रिया मराठे हिचा पती शंतनु मोघे याने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिलं जात होतं.
पवित्र रिश्ता मालिकेत साकारली होती भूमिका...
प्रिया मराठे या अभिनेत्रीने पवित्र रिश्ता या मालिकेत मोठी भूमिका साकारली होती. पवित्र रिश्ता या मालिकेत प्रिया मराठे हिने अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world