जाहिरात

Protest against Allu Arjun : अल्लु अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, महिलेच्या मृत्यूमुळे आंदोलन पेटलं

Allu Arjun Pushpa 2 : रविवारी अल्लु अर्जुनच्या हैद्राबाद येथील घराच्या बाहेर लोकांनी आंदोलन पुकारलं.

Protest against Allu Arjun : अल्लु अर्जुनच्या घरावर फेकले टोमॅटो, महिलेच्या मृत्यूमुळे आंदोलन पेटलं
हैद्राबाद:

लोकप्रिय तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुन याचा ‘पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचं प्रीमिअर हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी अल्लू अर्जुन स्वत: उपस्थित होता. त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या महिलेचा मृत्यू झाला होता. दरम्यान राज्यातून याचा विरोध दर्शविला जात आहे.

अल्लू अर्जुन अटक प्रकरणात वेगळाच ट्विस्ट, मृत महिलेचा पती म्हणाला...

नक्की वाचा - अल्लू अर्जुन अटक प्रकरणात वेगळाच ट्विस्ट, मृत महिलेचा पती म्हणाला...

रविवारी अल्लु अर्जुनच्या हैद्राबाद येथील घराच्या बाहेर लोकांनी आंदोलन पुकारलं. आंदोलकांनी त्यांच्या घराबाहेर तोडफोड केली. त्यांच्या घरावर टोमॅटोही फेकण्यात आलं. उस्मानिया विश्वविद्यालयातील जेएसी कार्यकर्त्यांनी अल्लुच्या घराबाहेर आंदोलन केल्याची माहिती आहे. 

या प्रकारानंतर आंदोलनांनी अल्लु अर्जुनच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे. आंदोलकांनी पुष्पा-२ वेळी चेंगराचेंगरी मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची मदत निधी देण्याची मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हैद्राबादमधील संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा जीव गेला होता. याशिवाय तिचा ८ वर्षांचा मुलगा अद्यापही कोमात आहे. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Allu arjun

परवानगीशिवाय प्रीमियरमध्ये सामील झाले अल्लु अर्जुन - मुख्यमंत्री रेड्डी
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 21 डिसेंबर रोजी विधानसभेत सांगितलं की, पोलिसांकडून परवानगी नसतानाही अल्लु अर्जुन पु्ष्पा - २ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सामील झाले होते. त्याने रोड शो दरम्यान आपल्या कारमधील सनरुफमधून हात दाखवला होता, ज्यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण जाली. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लु चित्रपटगृहाबाहेर गेला नाही, ज्यामुळे पोलिसांनी त्याला जबरदस्तीने बाहेर काढलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com