Dhurandhar 2 सिनेमादरम्यान थिएटरमध्ये पाहायला मिळतेय 'या' सिनेमाची झलक! 41 दिवसांनी होणार रिलीज

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील हा महासंग्राम 1 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होईल.

जाहिरात
Read Time: 2 mins

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास आता एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाच्या रूपात प्रेक्षकांसमोर येत आहे. रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाचा फर्स्ट लुक टीझर सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. 

टीझर केवळ थिएटर्समध्येच!

चित्रपट निर्मात्यांनी एक धाडसी आणि वेगळा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांना केवळ मोठ्या पडद्यावरच अनुभवता यावी, यासाठी टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मऐवजी थेट 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटासोबत थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Advertisement

'राजा शिवाजी' चित्रपटाची वैशिष्ट्ये

हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नसून ती साहस, सन्मान, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या जन्माची गाथा आहे. रितेश देशमुखने या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली असून, तो स्वतः महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्गज जोडी अजय-अतुल यांचे संगीत या कथेला अधिक प्रभावी बनवणार आहे.

(नक्की वाचा-  Dhurandhar 2: 'धुरंधर 2' ने उडवला धुरळा! 'बडे साहब'वरूनही पडदा उठला, अंडरवर्ल्ड डॉनला पाहून थक्क व्हाल!)

जगप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी हा ऐतिहासिक काळ कॅमेऱ्यात कैद केला आहे. ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

1 मे रोजी जगभरात प्रदर्शित

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे 2026 रोजी 'राजा शिवाजी' हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. भारताचा समृद्ध वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी नेतृत्व जगासमोर मांडण्याचे ध्येय टीमने ठेवले आहे. 

भव्य सिनेमॅटिक अनुभव

चित्रपट निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत असून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानाची भावना जागृत करेल. टीझर पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादावरून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठे विक्रम प्रस्थापित करेल, अशी आशा आहे.

Advertisement
Topics mentioned in this article