जाहिरात

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' ने उडवला धुरळा! 'बडे साहब'वरूनही पडदा उठला, अंडरवर्ल्ड डॉनला पाहून थक्क व्हाल!

Dhurandhar 2 The Revenge च्या प्री-रिलीज शोमध्ये 'बडे साहब'च्या रहस्यावरून पडदा उठला असून, ही व्यक्तिरेखा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची आहे. दानिश इक्बालने ही भूमिका साकारली असून चाहते यामुळे अत्यंत उत्सुक आहेत.

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' ने उडवला धुरळा! 'बडे साहब'वरूनही पडदा उठला, अंडरवर्ल्ड डॉनला पाहून थक्क व्हाल!

Dhurandhar 2 The Revenge Release: बहुप्रतिक्षित 'धुरंधर 2: द रिव्हेंज' 19 मार्च 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचे प्री-रिलीज शो 18 मार्च रोजीच पार पडले असून, सोशल मीडियावर 'धुरंधर 2' ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या भागात ज्या 'बडे साहब'च्या नावाने दहशत निर्माण केली होती, तो चेहरा अखेर प्रेक्षकांसमोर आला असून, ही भूमिका अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. 

कोण आहे 'बडे साहब'?

चित्रपटातील सर्वात मोठे गुपित म्हणजे 'बडे साहब'ची ओळख. प्री-रिलीज शोनुसार दाऊद इब्राहिमचा लूक चित्रपटात 'बडे साहब' म्हणजे कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्यक्तिरेखेला वृद्ध रूपात चित्रित करण्यात आले आहे.

Dhurandhar 2

कोणी साकारली भूमिका? 

विकिपीडिया आणि सूत्रांच्या माहितीनुसार, दानिश इक्बाल याने ही आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा सिनेमा मानला जात आहे. यात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. मुख्य भूमिकेत रणवीरचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. संजय दत्त आणि आर. माधवन या दोन्ही कलाकारांच्या भूमिका कथेला मोठी कलाटणी देणाऱ्या आहेत. अर्जुन रामपाल आणि सारा अर्जून यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. 

प्री-रिलीज शोचा धुमाकूळ

18 मार्च रोजी झालेल्या प्री-रिलीज शोमध्ये चाहत्यांनी 'फर्स्ट डे फर्स्ट शो'चा आनंद लुटला. प्रेक्षकांच्या मते, पहिल्या भागापेक्षाही 'धुरंधर 2' मध्ये अधिक सस्पेन्स आणि ॲक्शन आहे. आदित्य धर, लोकेश धर आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट हॉलिवूडच्या तोडीचा असल्याचे बोलले जात आहे.

dhurandhar 2

चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'बडे साहब'चे रहस्य उघड झाल्यामुळे आता सामान्य प्रेक्षकांमध्ये 19 मार्चच्या वर्ल्डवाईड रिलीजबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com