Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Wedding: रश्मिका मंदाना आणि विजयर देवरकोंडाचं लग्न आज 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरच्या आयटीसी मेमेन्टॉसमध्ये संपन्न झालं. 'विरोश'नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कपलने दोन वेगवेगळ्या विधींनुसार लग्नगाठ बांधली. सकाळी तेलुगु परंपरेनुसार शुभ मुहूर्तावर लग्न झालं.त्यानंतर रश्मिकाच्या कोडवा समाजाच्या परंपरेनुसार विधी पूर्ण करण्याचं ठरलं. हे लग्न प्रायमल थिमवर आधारित होतं.हळदी समारंभही होळीसारखं रंगीन होतं. संगिता सेरेमनीही दिमाखात सेलिब्रेट करण्यात आली. पीएम मोदींनीही या कपलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
चित्रपट 'गीता गोविन्दम'या चित्रपटाद्वारे रश्मिका-विजयची केमिस्ट्री सुरु झाली. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आणि आज हे कपल अखेर लग्नबंधनात अडकलं.चाहत्यांना आता या लग्नाच्या अधिकृत फोटोंची प्रतिक्षा आहे. कपलने आनंदात आणि प्रेमाने त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरु केला आहे. याचदरम्यान, कोडवा परंपरेचं लग्न खूप चर्चेत आहे.या लग्नासंबंधीत महत्त्वाच्या पाच गोष्टींबाबत जाणून घ्या. कोणी पुजारी किंवा पंडित नसतो - हिंदू लग्न प्रथेनुसार इथे कोणीही पंडीत किंपा पुजारी लग्नाचे विधी करत नाही. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी संपूर्ण लग्नाचे विधी पार पाडतात. पवित्र दिवा (ज्यामध्ये कावेरी मातेचा फोटो असतो) साक्ष मानून पूर्वजांकडून आशीर्वाद घेतला जातो.
नक्की वाचा >> "याला बहीण-मुलगी..", पुढच्या सीटवर रिक्षा चालकाच्या शेजारी बसली, नंतर जे घडलं..व्हिडीओ पाहून सर्वच थक्क
दोन दिवसांचा उस्तव (मंगला) - कोडवा लग्न सामान्यपणे दोन दिवस सुरु राहतं. पहिल्या दिवशी वेगवेगळ्या विधी जसं की, केतुवा (केळ्याच्या पानांना कापणे) जे ताकद आणि कौशल्याचं प्रतिक आहे. तसच यामुळे पूर्वजांच्या आठवणींनाही उजाळा मिळतो. दुसऱ्या दिवशी मुख्य मुहूर्त आणि पाणी किंवा गंगेच्या पुजेचे विधी पार पडतात. ज्यामध्ये वधू विहिरीतून पाणी आणते. हे नववधू घरच्या कामात सामील झाल्याचं प्रतिक मानलं जातं.
हुंड्याची कोणतीही प्रथा नाही
लग्नाच्या अशा परंपरेत हुंड्याची कोणतीही प्रथा नाही. दोन्हीकडून समसमान खर्च केला जातो. कोडवा समाजात हुंडा घेतला जात नाही. लग्नाचा खर्च वर आणि वधूच्या कुटुंबाकडून केला जातो. ज्यामुळे त्यांची एकता आणि स्भाविमानाची भावना समोर येते.
विशेष पारंपारिक पोशाख आणि अलंकार
वधू प्लेटवाली साडी नेसते, (जी योद्धा, विरासत आणि कावेरी नदीच्या कथेशी जोडलेली आहे).लाल किंवा सफेद साडीसोबत सोन्याचे दागिने जसं की पाथक, कोक्चेथाठी..वर सफेद जे पोशाख घालतो ज्यामधअये ओडिकाठी आणि पीचे काठी (तलवार आणि चाकू) ठेवतात. पूर्वज आणि कावेरी मातेचं महत्त्व - लग्नात पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देत आशीर्वाद दिला जातो आणि कावेरी माता (देवी कावेरी) कडे प्रार्थना केली जाते.हे समाजाची परंपरा, पूजा आणि योद्धा संस्कृती दर्शवतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world