जाहिरात

"याला बहीण-मुलगी..", पुढच्या सीटवर रिक्षा चालकाच्या शेजारी बसली, नंतर जे घडलं..व्हिडीओ पाहून सर्वच थक्क

प्रवासात महिला सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. लोकल ट्रेन, बस असो किंवा रिक्षा, महिलांसोबत काही विकृत माणसं अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करतात.

"याला बहीण-मुलगी..", पुढच्या सीटवर रिक्षा चालकाच्या शेजारी बसली, नंतर जे घडलं..व्हिडीओ पाहून सर्वच थक्क
Auto Driver Video Viral

Auto Driver And Woman Viral Video : प्रवासात महिला सुरक्षित नसल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. लोकल ट्रेन, बस असो किंवा रिक्षा, महिलांसोबत काही विकृत माणसं अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी महिलांसोबत विनयभंग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच सोशल मीडियावर एका ई-रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली नाही. या व्हिडीओनं लोकांची मनं जिंकली आहे.

कारण एक महिला प्रवासी रिक्षा चालकाच्या शेजारील पुढच्या सीटवर बसली, तेव्हा तिला अस्वस्थ वाटू नये म्हणून चालकाने संपूर्ण प्रवासात रिक्षाचे हँडल एका हातानेच चालवले. आपण अनेकदा लोकांना त्यांच्या कपड्यांवरून, कामावरून किंवा त्यांच्या दिसण्यावरून पारखतो. पण एखाद्या माणसाची खरी ओळख त्याच्या संस्कारांमधून आणि इतरांबद्दल असलेल्या आदरातून दिसून येते. इंस्टाग्रामवर व्हायरल होणारा हा रिक्षाचालकाचा मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ समाजाला "मानवता आणि स्त्रियांचा सन्मान" याबद्दलचा एक जबरदस्त उदाहरण आहे. हा व्हिडिओ पाहून लोक रिक्षाचालकाचे भरभरून कौतुक करत आहेत.

नक्की वाचा >> Instagram मुळे अख्ख्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, रस्त्यावरच रक्तरंजित खेळ, अंगावर काटा आणणारी कहाणी

या व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ @hi.mani8714 या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एका महिला प्रवाशानेच रेकॉर्ड केला आहे, जी रिक्षामध्ये पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या अगदी शेजारी बसलेली आहे. पुढच्या सीटवर बसल्यास ड्रायव्हरचा हात किंवा कोपर प्रवाशाला स्पर्श होण्याची शक्यता असते, ज्यामुळे विशेषतः महिलांना अनेकदा अस्वस्थ वाटू शकते. या रिक्षाचालकाने तिला अस्वस्थ वाटू नये म्हणून संपूर्ण प्रवास एका हाताने रिक्षा चालवत खूप संवेदनशीलता आणि आदर दाखवला. 

पण या रिक्षाचालकाने जे केले, त्याच्या कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत. महिला प्रवाशाला कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटू नये आणि तिच्या ‘व्यक्तिस्वातंत्र्याचा (स्पेसचा) आदर राखला जावा', यासाठी चालकाने संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा डावा हात खालीच ठेवला आणि फक्त उजव्या हाताने (एक हातानेच) रिक्षा चालवली.

नक्की वाचा >> Holi Special: नवी नवरी लग्नानंतरची पहिली होळी सासरी का साजरी करत नाही? अनेक जावयांना खास कारणं माहितच नाहीत

हा व्हिडीओ पाहून एका यूजरने म्हटलंय, “बहिण-मुलगी असलेला माणूस आहे, म्हणूनच स्त्रियांचा सन्मान कसा करायचा, हे त्याला माहित आहे.” दुसऱ्या यूजरने रिक्षाचालकाचे कौतुक करत म्हटलं, “यालाच खरा माणुसकी असलेला पुरुष म्हणतात.", एका महिला युजरने तिचा अनुभव शेअर करत म्हटलंय, “असं मीही अनेक वेळा अनुभवले आहे… अशा लोकांवर चांगले संस्कार घडलेले असतात."

Listen to the latest songs, only on JioSaavn.com