- रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाहसोहळा उदयपूर येथील आयटीसी मेमेंटोज हॉटेलमध्ये पार पडला
- या हॉटेलमध्ये 106 एकर परिसरात 117 हून अधिक सुइट्स आणि व्हिला आहेत
- ग्रँड प्रेसिडेंशियल सुइटचे एका रात्रीचे भाडे 2 लाख रुपयांपासून सुरू होते
Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Wedding Venue: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाहसोहळा उदयपूर येथील अत्यंत आलिशान अशा 'आयटीसी मेमेंटोज' (ITC Mementos) हॉटेलमध्ये संपन्न झालं. 106 एकर परिसरात पसरलेले हे हॉटेल अरावली पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या हॉटेलमधील एका रात्रीचे भाडे ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील, अशी स्थिती आहे. इथं सर्व राहाणं हे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेरचं आहे. राजेशाही थाटात हा लग्न सोहळा इथं पार पडला.
या हॉटेलमध्ये 117 हून अधिक सुइट्स आणि व्हिला आहेत. येथील सर्वात महागडा 'ग्रँड प्रेसिडेंशियल सुइट' असून त्याचे एका रात्रीचे भाडे 2 लाख रुपयांपासून सुरू होते. या सुइटमध्ये खाजगी गार्डन, पूल आणि स्वयंचलित तापमान नियंत्रण प्रणाली यांसारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. रश्मिका आणि विजयची एकत्रित संपत्ती पाहता, या शाही विवाहावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. दोघांच्या लग्ना मोजकेच पाहूणे आले होते. त्यांची सोय इथेच करण्यात आली होती.
अरावली पर्वतरांगांच्या निसर्गरम्य सानिध्यात वसलेले 'आयटीसी मेमेंटोज' हे हॉटेल 106 एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. येथील खोल्यांतून निसर्गाचे विलोभनीय दर्शन घडते. या हॉटेलमधील सर्वात महागडा 'ग्रँड प्रेसिडेंशियल सुइट' हा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. यामध्ये ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल सिस्टम, खाजगी गार्डन, पूल आणि पर्सनल सेफ यांसारख्या अति-लक्झरी सुविधा दिल्या जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, या सुइटचे एका रात्रीचे भाडे 2 लाख रुपयांपासून सुरू होते.
- वैली व्यू विला - ₹28,399 - ₹28,666
- वैली व्यू विला ट्विन - ₹28,399 - ₹28,666
- लेक व्यू विला - ₹30,799 - ₹31,088
- प्रीमियम विला - ₹34,799 - ₹35,126
- अरावली सुइट - ₹57,199 - ₹71,499
- मेमेंटोस सुइट - ₹73,199 - ₹91,499
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world