जाहिरात

Rashmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचे 'महाभारत' कनेक्शन काय? 2 वर्षापूर्वीचं आहे प्रकरण

हा विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून, भारतीय परंपरेचे प्रदर्शन ठरला, अशा भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.

Rashmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचे 'महाभारत' कनेक्शन काय? 2 वर्षापूर्वीचं आहे प्रकरण
  • रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या विवाहसोहळ्यात महाभारताच्या थीमचा वापर करण्यात आला होता
  • विजय देवरकोंडा यांनी कल्की 2898 एडी चित्रपटात अर्जुनाची भूमिका साकारली होती आणि त्याचा विवाहावर प्रभाव दिसला
  • लग्नाची मुख्य थीम प्राइमल होती ज्यात भारतीय संस्कृतीची मुळे आणि साधेपणा अधोरेखित करण्यात आला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाहसोहळा केवळ त्यांच्या रितीरिवाजांमुळेच नव्हे, तर त्याच्या अनोख्या 'थीम'मुळेही चर्चेत आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विवाहाच्या सजावटीत आणि काही विधींमध्ये 'महाभारत' या महाकाव्याचा प्रभाव दिसून आला. विजय देवरकोंडा याचे महाभारताशी असलेले खास नाते या निवडीमागे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्याची झलक या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली.  

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नात काय काय घडलं याचं गुपित आता हळूहळू उलगडू लागले आहे. या शाही विवाहात चक्क महाभारताची झलक पाहायला मिळाली. अनेकांना प्रश्न पडला असेल की, विजयचा महाभारताशी काय संबंध? तर याचे उत्तर त्याच्या 'अर्जुनाच्या' भूमिकेत दडलेले आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात अर्जुनाचे पात्र साकारणाऱ्या विजयने आपल्या खऱ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दिवसासाठी हीच खास थीम निवडली होती. त्यामुळे त्याच्या लग्नात ही थीम पाहायला मिळाली. 

नक्की वाचा - रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडाच्या लग्नात ना पंडित, ना फेरे..देशभरात होतेय लग्नाची चर्चा, काय आहे खास कारण?

विजय देवरकोंडा याने 2024 मधील गाजलेल्या 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात अर्जुनाची भूमिका साकारली होती. या भूमिकेशी असलेले त्याचे भावनिक नाते लक्षात घेऊन लग्नात महाभारतातील काही प्रतीकांचा वापर करण्यात आला. तसेच, या लग्नाची मुख्य थीम 'प्राइमल' (Primal) अशी होती. ज्याचा अर्थ मूळ किंवा आदिम संस्कृतीशी जोडले जाणे असा होतो. दिखाव्यापेक्षा भारतीय संस्कृतीची मुळे आणि साधेपणा जपणारी ही थीम या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली.

नक्की वाचा - Viral News: ऐश्वर्या रायला मुलगी झाली, त्यावेळी सलमानची पहिली प्रतिक्रीया काय होती? आता होतेय Viral

या लग्नासाठी 'प्राइमल थीम' निवडण्यात आली त्यामागे ही कारण होते. जुन्या काळी जशी लग्ने व्हायची, जिथे फुलांची सजावट, मातीचा सुगंध आणि लाकडी कोरीव काम असायचे. तसाच काहीसा माहोल उदयपूरच्या हॉटेलमध्ये तयार करण्यात आला होता. कोणत्याही भपक्याशिवाय, निसर्गाच्या सानिध्यात आणि प्राचीन परंपरांना साक्ष मानून हा विवाह पार पडला. रश्मिका आणि विजयने आपल्या संस्कृतीचा सन्मान करत या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

लग्नातील विशेष आकर्षणे:

  • महाभारत कनेक्शन: विजयने 'कल्की' चित्रपटात अर्जुनाची भूमिका केल्यामुळे लग्नात या महाकाव्याचे काही अंश (Touch) समाविष्ट करण्यात आले.
  • प्राइमल थीम: निसर्ग आणि मुळांशी जोडले जाण्यासाठी माती, लाकूड आणि नैसर्गिक रंगांचा सजावटीत वापर.
  • साधेपणा: आधुनिक झगमगाटापेक्षा पुरातन भारतीय संस्कृती आणि रितीरिवाजांना अधिक महत्त्व.
  • विधी: प्राचीन परंपरांप्रमाणे प्रत्येक रस्म त्याच्या मूळ स्वरूपात पार पाडण्यात आली.

हा विवाह सोहळा केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून, भारतीय परंपरेचे प्रदर्शन ठरला, अशा भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com