Akshay Kumar Raveena Tondon: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सिनेरसिकांना ख्रिसमसचं गिफ्ट दिलंय. नाताळच्या मुहूर्तावर त्याने 'वेलकम 3' सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलाय. सिनेमाच्या स्टारकास्टनंही सिनेरसिकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि वर्ष 2026मध्ये सिनेमा रिलीज होणार असल्याचंही जाहीर केलंय. अक्षयने इतक्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्यासंदर्भात म्हटलंय की, "मी कधीही इतक्या मोठ्या टीमचा हिस्सा राहिलेलो नाहीय... आमच्यापैकी कोणीही नाही". हा सिनेमा प्रेक्षकांसाठी एक मोठं गिफ्ट असल्याचंही अक्षयने म्हटलंय.
रवीना टंडनने वेधलं लक्ष
जवळपास दोन दशकांनंतर अक्षय कुमार आणि रवीना टंडन पुन्हा एकदा स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत, याच गोष्टीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रेक्षकांमध्ये या जोडीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. 1990चं दशक रवीना-अक्षयच्या जोडीने गाजवलं होतं. या दोघांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. टीझरमध्ये रवीना टंडन पारंपरिक लुकमध्ये दिसतेय, तर अक्षय कुमारची दोन पात्रं पाहायला मिळाली आहेत. इतक्या वर्षांनंतर रवीना टंडनही अक्षयसोबत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झालीय.
'वेलकम टू द जंगल' सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट
अहमद खान दिग्दर्शित 'वेलकम टू द जंगल' सिनेमामध्ये सुनील शेट्टी, अरशद वारसी, परेश रावल, दिशा पाटनी, तुषार कपूर, जॉनी लिव्हर, पुनीत इस्सर आणि अन्य कित्येक कलाकारांची मोठी टीम आहे. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झालंय, सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकण्यासाठी सज्ज झालाय. सर्वांचं लक्ष विशेषतः अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर आहे, सिनेमामध्ये दोघं नेमकं कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
(नक्की वाचा: Hrithik Roshan Dance Video: बाप से बेटा सवाई! तारे गिन गिन गाण्यावर हृतिक रोशननं मुलांसोबत केला धमाकेदार डान्स)
वेलकम 3 सिनेमाचं टीझर | Welcome 3 Movie Teaser VideoTrack Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
