Atharva Sudame Controversy Video : अथर्व सुदामेचं काय चुकलं? पाहा डिलिट केलेला Video

गणेशोत्सव दोन दिवसांवर असताना अथर्व सुदामेनं हिंदू-मुस्लीम ऐक्यासंदर्भातला एक व्हिडीओ ट्विट (atharva sudame controversy video) केला होता. सुदामेच्या या व्हिडीओनंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले

जाहिरात
Read Time: 2 mins

Atharva Sudame Video : रीलस्टार आणि कंटेन्ट क्रिएटर (content creator) अशी ओळख असलेल्या अथर्व सुदामेनं एक व्हिडीओ पोस्ट केला आणि पुढच्या काही तासांतच तो व्हिडीओ डिलीटही केला. गणेशोत्सव दोन दिवसांवर असताना अथर्व सुदामेनं हिंदू-मुस्लीम ऐक्यासंदर्भातला एक व्हिडीओ ट्विट (atharva sudame controversy video) केला होता. सुदामेच्या या व्हिडीओनंतर हिंदुत्ववादी आक्रमक झाले, त्यांनी सुदामेला ट्रोल केलं. तर काही नेत्यांनी सुदामेला साथ दिली. मात्र प्रश्न हासुद्धा आहे. अथर्व सुदामेनं व्हिडीओ डिलीट केलाच कशाला?

अथर्व सुदामे, तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही हे नाव नक्कीच ओळखत असाल. आघाडीचा कंटेंट क्रिएटर, युट्यूबर अशी त्याची ओळख. अथर्व सुदामे राज ठाकरेंचा विशेष लाडका. याच अथर्व सुदामेनं आता गणेशोत्सव तोंडावर असताना एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ होता हिंदू-मुस्लीम ऐक्याचा. अथर्व सुदामेनं हा व्हिडीओ पोस्ट करताच हिंदुत्ववादी अथर्व सुदामेच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले. त्याला धमकीची फोन, मेसेज येऊ लागले. हिंदू मुस्लीम ऐक्याची अक्कल शिकवू नको, तू करमणूक कर आणि स्वतःचं पोट भर, असं म्हणत हिंदू महासंघानं अथर्व सुदामेला बजावलंय. हा सगळा गदारोळ झाल्यानंतर अथर्व सुदामेनं तो व्हिडीओ डिलीट केला. आणि कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफीही मागितली. (atharva sudame controversy video youtube)

नक्की वाचा - Pune Road Rage : पुण्यातील दुचाकीस्वारांची दादागिरी! Wrong Side ने आला म्हणून हटकलं; चालकाला केलं रक्तबंबाळ

अथर्व घाबरतोस कशाला आणि माफी मागतोस कशाला, असं म्हणत काही जण अथर्वच्या बाजूनं मैदानात उतरलेत. हिंदू-मुस्लीम विद्वेषाच्या काय कुठल्याही समाजाबद्दल, धर्माबद्दल विद्वेषाच्या पोस्ट कुणी केल्याच तर त्या डिलीटही करायला हव्या आणि अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईही व्हायला हवी. पण हिंदू मुस्लीम ऐक्याबद्दलची पोस्ट डिलीट करावी लागत असेल तर हा काळ किती भयंकर आहे, आणि समाज म्हणून आपण कुठे चाललोय याचा विचार प्रत्येकानं आवर्जून करा. ज्याला जिथून गणपतीची मूर्ती घ्यायची असेल, तिथून त्यानं घ्यावी. पण इथून मूर्ती विकत घेऊ नका, हे सांगण्याचा अधिकार कुणी दिला.  
 

Advertisement


कोल्हापूरात मशिदीवर गणपती आहे. वारीमध्ये तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम अनगड शाह बाबांच्या दर्ग्यात असतो. पंढरीच्या वारीत सहभागी होणारे अनेक मुस्लीम वारकरी आहेत. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र आले तर गावागावांमधला मुस्लीम समाज दुसऱ्या दिवशी कुर्बानी देतो. लालबागचा राजा विसर्जनाला निघतो, तेव्हा मशिदीतून त्याची आरती केली जाते. गावागावांतले सण हिंदू-मुस्लीम एकोप्यानं साजरे करतो. अठरा पगड जातींचा आणि सगळ्या धर्मांचा आदर करणारा महाराष्ट्र एकोप्यानं आणि आनंदानं नांदतोय. सुसंस्कृत महाराष्ट्राची ही सुंदर वीण उसवण्याचं कटकारस्थान कोण आखतंय ?