जाहिरात

Pune Road Rage : पुण्यातील दुचाकीस्वारांची दादागिरी! Wrong Side ने आला म्हणून हटकलं; चालकाला केलं रक्तबंबाळ

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. पुण्यातील अशा गुंडांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. हे या घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Pune Road Rage : पुण्यातील दुचाकीस्वारांची दादागिरी! Wrong Side ने आला म्हणून हटकलं; चालकाला केलं रक्तबंबाळ

Pune Crime Video : पुण्यातून दादागिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आतापर्यंत पुण्यातून दादागिरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अगदी कोयत्या गँगचीही पुण्यात दहशत असते. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. दुचाकीवरुन wrong side ने येणाऱ्या तरुणांमुळे दुसऱ्या बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे ओला चालकाने त्याला हटकलं. यावर आपली चूक मान्य करण्याऐवजी तरुणांनी आणखी दोघांना बोलावलं आणि चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Driving Violation of Vehicle Rules)

नेमकं काय घडलं? 

ही घटना पुण्यातील खडकी रोड परिसरातील आहे. ही घटना सायंकाळी ५.४५ दरम्यानची आहे. यावेळी काही दुचाकी wrong Side ने येत होत्या. परिणामी दुसऱ्या बाजूना वाहनांची रांग लागली होती. मात्र यावर आपली चूक मान्य करण्याऐवजी दुचाकीवरील तरुण दादागिरी करू लागले. यादरम्यान चालकाने पोलिसांना फोन केला. मात्र तोपर्यंत चालकाला दुचाकीवरील तरुणांनी जबर मारहाण केली होती. चालकाला अक्षरश: रक्तबंबाळ केलं. 

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. पुण्यातील अशा गुंडांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. यावर वचक आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. पुण्यात नियम तोडून वाहनं चालवली जातात आणि यावर वचक नसल्यामुळे हे तरुण निर्ढावल्याचं दिसून येत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com