Renuka Shahane: 'माझ्यासोबत राहा, महिना पगार देतो'; रेणुका शहाणेला निर्मात्यानं दिली होती घाणेरडी ऑफर

Renuka Shahane on Casting Couch :  बॉलिवूड (Bollywood) मध्ये 'कास्टिंग काऊच' (Casting Couch) नावाचा भयावह प्रकार नवीन नाही. अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला अशा वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Renuka Shahane: अभिनेत्री रेणुका शहाणेनं धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
मुंबई:

Renuka Shahane on Casting Couch :  बॉलिवूड (Bollywood) मध्ये 'कास्टिंग काऊच' (Casting Couch) नावाचा भयावह प्रकार नवीन नाही. अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला अशा वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं आहे. आता 'हम आपके हैं कौन' (Hum Aapke Hain Koun) या चित्रपटातील अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हिने तिच्यासोबत घडलेला असाच एक धक्कादायक प्रसंग उघड केला आहे.

'माझ्या आईसमोरच म्हणाला, माझ्यासोबत राहा'

रेणुका शहाणेने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या सुरुवातीच्या दिवसांतील कटू आठवण सांगितली. ती म्हणाली, "एक निर्माता (Producer) माझ्या घरी आला आणि त्याने मला सरळ प्रस्ताव दिला. तो विवाहित (Married) आहे हे त्याने सांगितलं, पण त्याने मला एका साडी कंपनीची ब्रँड अँबेसेडर (Brand Ambassador) बनवण्याचं आमिष दाखवलं. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, माझ्यासोबत राहण्यासाठी (Living Together) तो मला दर महिना 'स्टायपेंड' (Stipend) देईल."

रेणुका म्हणाली की, हा धक्कादायक प्रस्ताव ऐकून माझी आई (Mother) आणि मी दोघीही अस्वस्थ झालो. रेणुकाने हा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर निर्मात्याने दुसरीकडे त्याचा मोर्चा वळवला.

( नक्की वाचा : Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल )
 

'नकार दिला तर बदला घेतात'

रेणुका शहाणेने सांगितले की, अशा गैरवर्तनाला नकार देण्याची मोठी किंमत मोजावी लागते. इंडस्ट्रीचं (Industry) स्वरूप सांगताना ती म्हणाली की, "अनेकदा जेव्हा तुम्ही अशा वाईट गोष्टींना नकार देता, तेव्हा हे शक्तीशाली लोक (Powerful People) सूड घेण्यासाठी (Revenge) येतात. ते इतरांना सांगतात की या अभिनेत्रीला काम देऊ नका. हा मोठा धोका आहे."

Advertisement

रेणुकाने सांगितलं की, नकार दिल्यावर लोकांना प्रोजेक्टमधून काढलं जातं, त्यांचा छळ केला जातो किंवा कधीकधी त्यांच्या कामाचे पैसे (Payment) देखील नाकारले जातात. "हे लोक एकत्र येतात आणि पीडितेला (Victim) आणखी त्रास देण्याचा प्रयत्न करतात," असं रेणुका म्हणाली.

( नक्की वाचा : Govinda Affair: 'गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर...', पत्नी सुनीता आहुजाचा धक्कादायक गौप्यस्फोट )
 

'मी टू' नंतरही स्थिती जैसे थे

'मी टू' (MeToo) चळवळ काही वर्षांपूर्वी मोठी झाली होती, पण आता ती कमकुवत झाली असल्याचं रेणुकाचं म्हणणं आहे. ती म्हणाली की, "मी टू नंतर, ज्यांच्यावर आरोप झाले होते, ते लोक 5-6 वर्षांनंतर सर्वकाही विसरून पुन्हा चांगलं काम करत आहेत. जर तुम्ही कोणावर आरोप केला आणि तुमच्याकडे पोलिसात तक्रार (Police Case) किंवा ठोस पुरावा नसेल, तर लोक तुम्हालाच उलट प्रश्न विचारून पुरावा मागतात."

रेणुका शहाणेने प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिचं उदाहरणही दिलं. ती म्हणाली, "रवीना टंडनसारखी मोठी नायिका (A-Lister) असूनही तिला काळजी घ्यावी लागत होती. आऊटडोअर शूट्सच्या वेळी आम्ही रोज रूम (Room) बदलत असू, जेणेकरून कोणी येऊ नये आणि त्रास देऊ नये, असं रवीनाने मला सांगितलं होतं."

Advertisement

रेणुका शहाणे नुकतीच 'दुपहिया' (Dupahiya) या वेब सीरिजमध्ये (Web Series) दिसली होती.
 

Topics mentioned in this article